एकाच वेळी दाेन / एकाच वेळी दाेन जागी निवडणूक लढवण्यास निवडणूक अायाेगाचाही विराेध

एकाच उमेदवाराने एकाच वेळा दाेन मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास निवडणूक अायाेगानेही विराेध दर्शवला अाहे. या प्रकारामुळे निवडणुकीचा खर्च वाढताे, अशी भूमिका अायाेगाने बुधवारी शपथपत्राद्वारे सुप्रीम कोर्टात मांडली. दाेन मतदारसंघांतून विजयी हाेणारा उमेदवार नंतर एका जागेवर राजीनामा देताे. तिथे हाेणाऱ्या पाेटनिवडणुकीचा खर्च संबंधित उमेदवाराकडूनच वसूल करायला हवा, असे मतही अायाेगाने मांडले. भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी दाेन मतदारसंघांतून एका उमेदवारास निवडणूक लढवण्याची मुभा रद्द करावी, या मागणीची याचिका दाखल केली अाहे. लाेकप्रतिनिधी कायद्यात असलेली ही तरतूद अयाेग्य असल्याचे त्यात म्हटले अाहे. या मागणीचे निवडणूक अायाेगानेही समर्थन केले.

वृत्तसंस्था

Apr 05,2018 02:00:00 AM IST

नवी दिल्ली- एकाच उमेदवाराने एकाच वेळा दाेन मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास निवडणूक अायाेगानेही विराेध दर्शवला अाहे. या प्रकारामुळे निवडणुकीचा खर्च वाढताे, अशी भूमिका अायाेगाने बुधवारी शपथपत्राद्वारे सुप्रीम कोर्टात मांडली. दाेन मतदारसंघांतून विजयी हाेणारा उमेदवार नंतर एका जागेवर राजीनामा देताे. तिथे हाेणाऱ्या पाेटनिवडणुकीचा खर्च संबंधित उमेदवाराकडूनच वसूल करायला हवा, असे मतही अायाेगाने मांडले. भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी दाेन मतदारसंघांतून एका उमेदवारास निवडणूक लढवण्याची मुभा रद्द करावी, या मागणीची याचिका दाखल केली अाहे. लाेकप्रतिनिधी कायद्यात असलेली ही तरतूद अयाेग्य असल्याचे त्यात म्हटले अाहे. या मागणीचे निवडणूक अायाेगानेही समर्थन केले.

काेर्टाने मागवला सल्ला
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने अॅटर्नी जनरल के. के. वेणुगाेपाल यांच्याकडे सल्ला मागितला अाहे. त्यावर उत्तर देण्यासाठी वेणुगाेपाल यांनी वेळ मागितला अाहे. त्यामुळे कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलैपर्यंत पुढे ढकलली.

X
COMMENT