आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जाचा एक रुपया उरला तरी बँकेने ठरवले डिफॉल्टर, तारण सोनेही परत देण्यास नकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क/ चेन्नई - एकिकडे विजय मल्ल्या आणि नीरव मोदी सारखे बिझनेसमन बँकांना हजारो कोटींचा चुना लावून विदेशात मजा करत आहेत. तर दुसरीकडे एका ग्राहकाने बँकेला अवघा एक रुपया परत केला नाही तरी त्याला डिफॉल्टर जाहीर करण्यात आले. एवढेच नाही तर बँकेने ग्राहकाला त्याने तारण म्हणून ठेवलेले 138 ग्रॅम सोनेही परत करण्यास नकार दिला. या सोन्याची किंमत सुमारे साडे तीन लाख रुपये आहे.  


हे प्रकरण तमिळनाडूच्या कांचीपुरम सेंट्रल को-ऑपरेटिव बँकेच्या पल्लवरम शाखेतील आहे. स्वतःचे सोने वरत मिळवण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच वर्षांपासून चकरा मारणाऱ्या या व्यक्तीने अखेर हायकोर्टात दाद मागितली आहे. कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, बँकेने 138 ग्रॅम सोने देण्यास नकार दिला आणि कारण सांगितले की, त्यांच्या प्रत्येक लोन खात्यात एक एक रुपया कर्ज शिल्लक आहे. आता बँक सोने परत घ्यायलाही तयार नाही आणि कर्जाचा शिल्लक असलेला रुपयाही घ्यायला तयार नाही. हायकोर्टाचे जस्टीस टी राजा यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत नोटिस जारी करून बँकेकडून 2 आठवड्यांत उत्तर मागितले आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...