आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 कोटींपेक्षा जास्तच्या बँक कर्जदारांना द्यावी लागेल Passport डिटेल्स, PNB फ्रॉडनंतर निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) 12,672 कोटींच्या घोटाळ्यानंतर केंद्र सरकरने बँकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. त्यानुसार 50 कोटींपेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्यांना त्यांचे पासपोर्ट डिटेल्स बँकेला द्यावे लागणार आहेत. अशी व्यक्ती काही घोटाळा करत असल्याची शंका आल्यानंतर बँक संबंधीत यंत्रणांना माहिती देऊन अशा व्यक्तीला विदेशात पळून जाण्यापासून रोखू शकते. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि गीतांजली जेम्सचा मालक मेहुल चौकसी जानेवारीमध्ये देशातून फरार झाले. त्याआधी मद्यसम्राट विजय मल्ल्या 9000 कोटींचे कर्ज बुडवून विदेशात पळून गेला आहे. 

 

अर्थ सचिवांनी ट्विट केले 
- अर्थ सचिव राजीव कुमार यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, 'बँकिंग व्यवस्था अधिक स्वच्छ आणि जबाबदार करण्यासाठी पुढचे पाऊल उचलले जात आहे. 50 कोटींपेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला आता बँकेला पासपोर्ट डिटेल्स द्वावे लागतील. यामुळे घोटाळे करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करता येईल.'
- सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, 50 कोटींपेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्या खातेदारांकडून पुढील 45 दिवसांमध्ये त्यांची पूर्ण माहिती बँकेला मिळाली पाहिजे. 

 

बँकांकडे पासपोर्ट डिटेल्स नसल्याने कारवाई रेंगाळली 
- सध्या अशी कोणतीही व्यवस्था नाही ज्यामाध्यमातून बँका कर्जदारांकडून त्यांचे पासपोर्ट डिटेल्स मिळवेल. कर्ज थकले आणि ते फेडण्याची इच्छा नसलेले लोक सध्या देश सोडून जात आहेत. त्यांना थांबवण्यासाठी बँकेकडे कोणतीही यंत्रणा नाही. 
- याशिवाय बँक आणि संबंधीत यंत्रणा यांच्यात माहितीची देवाण-घेवाण होऊन कारवाई होण्यास वेळ लागतो. 
- याच त्रुटीचा फायदा गेल्या काही वर्षात नीरव मोदी, मेहुल चौकसी, विजय माल्ल्या, जतिन मेहता यांनी घेतला. कोट्यवधींचे कर्ज बुडवून ते विदेशात फरार झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...