आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Alert: पुढचे 3 दिवस बँका राहतील बंद, Bank Holidays For 3 Days In April

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एप्रिल महिन्याच्या अखेरीस सलग 3 दिवस बँका बंद, ATMमध्ये होऊ शकते रोखीची चणचण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बँका 28 ते 30 एप्रिलपर्यंत सलग 3 दिवस बंद राहतील. यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांना रोखीची अडचण भेडसावू शकते. 28 एप्रिल रोजी महिन्याचा चौथ शनिवार आहे, दुसऱ्या दिवशी रविवार. सोमवारी बुद्धपौर्णिमेची सुटी असल्याने बँका बंद राहतील. मागच्या काही दिवसांत तब्बल 8 राज्ये-  दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, तेलंगाना, झारखंड, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात रोखीचे संकट निर्माण झाले होते. एटीएममध्ये कॅश नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
 
पुन्हा रिकामे होऊ शकतात एटीएम
- 3 दिवस सुटी असल्याने शुक्रवारी एटीएममध्ये कॅश टाकली जाणार नाही. यामुळे लोकांना पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागू शकतो.
- जास्त सुट्यांच्या वेळी तसे पाहिले तर बँका अतिरिक्त कॅशचा बंदोबस्त करतात, परंतु मागच्या काही दिवसांतील परिस्थिती पाहता यावेळी पुन्हा रोखीचे संकट निर्माण होऊ शकते. देशाच्या अनेक भागांत एटीएम रिकामे झाल्याने सरकारला अनेक वेळा सफाई द्यावी लागली होती. आरबीआय आणि एसबीआयनेही कॅशची चणचण होणार नसल्याचे म्हटले आहे. सोबतच ज्या भागांतून तक्रारी आल्या होत्या, तेथे अतिरिक्त कॅश पाठवण्यात आली होती.
 
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका राहतात बंद
- महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतात. सप्टेंबर 2015 पासून ही व्यवस्था लागू आहे. बँक कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करत सरकारने ही सुटी लागू केली होती.
 
एटीएम आणि बँकांशिवाय इतरही पर्याय
- एटीएममध्ये नो कॅशमुळे त्रस्त असलेले छोट्या शहरातील लोक एसबीआयच्या पॉस मशीनमधूनही पैसे काढू शकतात. पॉस मशीनमधून एका दिवसात 2,000 रुपयांपर्यंत रक्कम काढली जाऊ शकते. यात कोणताही चार्ज लागत नाही. एसबीआय शिवाय दुसऱ्या बँकांच्या एटीएम कार्डच्या माध्यमातून ही पॉस मशीनमधून पैसे काढता येतात.
 
कोणत्या शहरात किती आहे लिमिट?
 
शहर श्रेणी पॉस मशीनमधून विथड्रॉल लिमिट (रुपये)
टीयर-1 1,000
टीयर-2 1,000
लहान वस्ती 2,000
 
- आरबीआयच्या गाइडलाइननुसार, रिटेल आउटलेट्समध्ये ठेवलेल्या पॉस मशीनमधून पैसे काढण्याची मर्यादा 1000 ते 2000 रुपयांपर्यंत आहे.
 
एसबीआयकडे किती आहेत पॉस मशीन्स?
- देशभरात एसबीआयच्या एकूण 6 लाख 8 हजार पॉस मशीन आहेत, ज्यापैकी 4.78 लाख मशीनमध्ये कॅश विदड्रालची सुविधा आहे.
- एसबीआयसोबतच इतर बँकांच्या ग्राहकांसाठीही ही सुविधा आहे.

 

एप्रिलच्या सुरुवातीच्या दिवसांत दिसले होते संकट

- अर्थ मंत्रालयानुसार, देशात दर महिन्यात रोखीची मागणी 19 हजार कोटी ते 20 हजार कोटी रुपयांच्या आसपास असते. परंतु एप्रिलच्या सुरुवातीच्या 13 दिवसांत ही डिमांड वाढून 40 हजार कोटी रुपयांपासून ते 45 हजार कोटी रुपयांदरम्यान झाली. मागणीत झालेली ही अचानक वाढ आंध्र, तेलंगण, कर्नाटक, एमपी आणि बिहारमध्ये दिसून आली. याचा थेट परिणाम एटीएम आणि बँकांवर झाला. 
- देशात दर महिन्याला 20 हजार कोटी रुपये एवढी कॅशची मागणी असते.  

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...