आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेचे शेवटचे दोन दिवस बँका बंद राहाणार, या साठी 10 लाख कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे हत्यार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मे महिन्यात 30-31 मे रोजी 10 लाख बँक कर्मचारी संपावर जाणार. (फाइल) - Divya Marathi
मे महिन्यात 30-31 मे रोजी 10 लाख बँक कर्मचारी संपावर जाणार. (फाइल)

मुंबई - बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात फक्त 2% वाढ करण्यात आली आहे. इंडियन बँक असोसिएशनने (आयबीए)  घेतलेल्या या निर्णयाविरोधात देशभरातील 10 लाख बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. 30-31 मे रोजी बँकांचे कामकाज ठप्प राहाणार आहे. 

 

काय आहे बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या 
- वेतन निर्धारण प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण         करावी. 
- महागाईनुसार वेतन आणि भत्ते निर्धारीत करावे. सर्वच ग्रेडच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश करावा. 

- बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्स आणि आयबीए यांच्यात 2 मे 2017 ते 12 नोव्हेंबर 2017 दरम्यान 13 बैठका झाल्या होत्या. पगारवाढीच्या विषयावर नुकतीच 5 मे रोजी शेवटची चर्चा झाली. मागील वर्षांच्या नोव्हेंबरपासून बँक कर्मचाऱ्यांना पगारवाढीतील फरक मिळालेला नाही. 


10 लाख कर्मचारी 48 तास जाणार संपावर 
-  यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सच्या बॅनरखाली बँक कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. या फोरमसोबत देशभरातील 9 बँक यूनियन आहेत. यात एसबीआयसह इतर सरकारी बँकांचे 10 लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. 30 मे रोजी सकाळी 6 वाजतापासून एक जूनच्या सकाळी 6 पर्यंत कर्मचारी संपावर जाणार आहेत. यामुळे बँकिंग सेवांवर मोठा परिणाम होणार आहे. 

 

गेल्यावर्षी 15% वाढ, यंदा फक्त 2% का? 
- 1 नोव्हेंबर 2012 ते 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत बँक कर्मचाऱ्यांना 15% वेतनवाढ मिळाली होती. त्यामुळे बँक कर्मचारी म्हणाले, की 2% वाढ देऊन आमची खिल्ली उडवण्यात आली आहे. 
- आयबीएने म्हटले आहे, की स्केल-III पर्यंतच्या कर्मचाऱ्यांशी संबंधीतच चर्चा होईल. 

बातम्या आणखी आहेत...