आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! लिंकवर क्लिक करताच बँक अकाउंटमधून गायब होतात पैसे, आयकर विभागाचा नव्हे, हॅकर्सचा आहे ईमेल!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाचा एखादा ईमेल आला आणि त्यात लिहिले असेल की, 'आयटीआर दाखल करताना तुम्ही फॉर्ममध्ये काही चुका केल्या आहेत, अथवा पूर्ण डिटेल दिलेले नाहीत. त्या चुका दुरुस्त करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.' तेव्हा तुम्ही चुकूनही असे करू नका, कारण असे केल्यास क्षणार्धात तुमच्या बँक अकाउंटमधील पैसे गायब होऊ शकतात. कारण हा ई-मेल आयकर विभागाने नाही, तर हॅकर्सने पाठवलेला आहे. वास्तविक, हॅकर्सनी लोकांच्या बँक अकाउंटवर डल्ला मारण्याची नवी पद्धत शोधली आहे.

 

असा मेल आल्यास करा इग्नोर
आयकर विभागाच्या ई-मेल आयडीशी मिळता-जुळता जोही ईमेल येतो तसेच ज्यात लिंकवर क्लिक करा, किंवा बँक खाते, आधार कार्ड, पॅन कार्ड, खात्याची डिटेल मागितली जाते, त्या ईमेलकडे दुर्लक्ष करा.

 

खऱ्या अन् खोट्या ई-मेल आयडीमध्ये काय आहे फरक?


खरा मेल आयडी - donotreply@incometaxindiafilling.gov.in

खोटा मेल आयडी - donotreply@incometaxindiaefiling.gov.in

 

असे ओळखा:
दोन्ही ई-मेल आयडी बारकाईने पाहिल्यास कळते की, बनावट ई-मेल आयडीमध्ये fillingच्या आधी e (ई) जास्तीचे लिहिले आहे. तर filling मध्ये एक l (एल) कमी आहे.

 

लिंकवर क्लिक केल्यावर उघडते नेटबँकिंग
हॅकर्सनी पाठवलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करताच नेटबँकिंग सुरू होते. याच ऑप्शन जसजसे तुम्ही फॉलो करतात, तुमचे बँक अकाउंट डोळ्यांदेखत हॅक झालेले असते. हॅकर येथे तुमच्या खात्यावर नियंत्रण मिळूव सगळे पैसे काढून घेतो.

 

आयकर विभाग पाठवत नाही अशी कोणतीही लिंक
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट भोपाळचे एक अधिकारी म्हणाले की, विभागाने वेबसाइटच्या मुख्य पानावर इशाराच जारी केलेली आहे की, इन्कम टॅक्स विभाग त्रुटी राहिल्याचा कोणताही मेल पाठवत नाही. तसेच आयकर विभाग या पद्धतीने करदात्यांना त्यांच्या बँक खाते, पॅन नंबर, एटीएमची माहितीही मागत नाही. कारण करदात्यांची पूर्ण डिटेल्स आयकर विभागाकडे आधीपासूनच असते.

 

अधिकारी म्हणाले की, ग्राहकांच्या मोबाइल फोनवर मेसेज पाठवून सावध केले जाते. कुणालाही आपली वैयक्तिक माहिती उदा. बँक खात्यांची डिटेल्स, पॅन, आधार कार्डचा नंबर अशी माहिती देऊ नका. जर एखाद्याने फोनवर स्वत:ला आयकर विभागाचा अधिकारी सांगितले असेल, तरीही त्याला माहिती देऊ नका. आयकर विभागाच्या कार्यालयात संपर्क करा.

 

 

बातम्या आणखी आहेत...