आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावरील भारत बंद ठरला निष्प्रभ, बिहारमध्‍ये हवेत गोळीबार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारमधील आरा मध्ये सायकलचे टायर पेटवून रास्तारोकोचा प्रयत्न झाला. - Divya Marathi
बिहारमधील आरा मध्ये सायकलचे टायर पेटवून रास्तारोकोचा प्रयत्न झाला.

नवी दिल्ली - आरक्षणाविरोधात मंगळवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत बंदचे आवाहन केले गेले होते. मात्र, बिहार पंजाब वगळता देशातील इतर भागांत बंदचा परिणाम दिसून आला नाही. बिहारच्या आरा, दरभंगा, नालंदा, गयासह १२ जिल्ह्यांत हिंसाचार, तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडल्या. चकमकींत १५ जण जखमी झाले. अनेक जागी रेल रोको करण्यात आले. दुसरीकडे, पंजाबच्या फिरोजपूरमध्ये दुकाने बंद करण्यावरून दोन गटांत वाद होत तोडफोड झाली.


२ एप्रिलच्या बंदचा सर्वाधिक फटका बसलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेशात कडेकोट बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात होती. या राज्यांत काही ठिकाणी दुकाने काही तासांपुरती बंद होती.

 

बिहार : हवेत गोळीबार
आरक्षणविरोधी संघटनांनी अनेक शहरांत बंद पुकारला. आरात जमावबंदी लागू होती. निदर्शकांचा एक जमाव जय भीम, तर दुसरा जय श्रीरामच्या घोषणा देत होता. मुजफ्फरपूरमध्ये पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.

 

बिहारमध्ये कुठे-कुठे बंद? 
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौऱ्यावर आहेत. त्याच दिवशी बंद पुकारण्यात आला आहे. 
- पाटण्यात सगुना येथे जाळपोळ करण्यात आली आहे. रास्तारोको करण्यात आला. फतुहा येथे रास्ता रोका केला गेला. 
- आरा : वीर कुंवर सिंह विद्यापीठाने आज होणारी लॉची परीक्षा स्थगित केली आहे. 
- नालंदा : हिलसा येथे बंद समर्थकांनी रेल्वे रोको केला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्तारोको केला गेला आहे.

 

गृहमंत्रालयाचे सतर्कतेचे आदेश 
- केंद्रीय गृहमंत्रालयाने बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी देशात देशभर सतर्कतेचे आदेश दिले आहे. 

 

2 एप्रिल रोजीच्या बंद दरम्यान 17 जणांचा मृत्यू 
- याच महिन्यात 2 एप्रिल रोजी आंबेडकरवादी संघटनांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात सोशल मीडियावरुन भारतबंदचे आवाहन केले होते. 
- या दरम्यान मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थानसह 10 राज्यात बंदचा परिणाम दिसला होता. यावेळी झालेल्या हिंसाचारादरम्यान 17 जणांचा मृत्यू झाला होता. सर्वाधिक 7 जणांचा मृत्यू मध्यप्रदेशात झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...