आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार: लालूंकडून नितीशकुमार व मोदींना धोबीपछाड, 62 हजार मतांनी भाजपचा पराभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- बिहारमध्ये एक लोकसभा व दोन विधानसभेच्या पोटनिवडणूक निकालात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपच्या आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आररिया लोकसभा मतदारसंघातून लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) उमेदवार सर्फराज आलम यांनी 61 हजार 788 मतांनी विजय मिळवला आहे. आरजेडीचे सर्फराज आलम यांना 5 लाख 9 हजार 334 मते मिळाली. तर भाजपचे प्रदीप सिंह यांना 4 लाख 47 हजार 546 मते मिळाली आहेत. भाजपचे उमेदवार प्रदीप सिंह यांच्यावर आलम यांनी दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) खासदार तस्लीमुद्दीन यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती.

 

भाजपने लालूंना नव्हे एका विचारधारेला तुरूंगात टाकले- तेजस्वी

 

बिहारमध्ये आरजेडीने मोठा विजय मिळविल्यानंतर लालू पुत्र तेजस्वी यादव म्हणाले, हा जनतेने भाजपला शिकवलेला धडा आहे. तुम्ही लालूंना नव्हे एका विचारधारेला तुरूंगात कैद केले आहे. मात्र, जनता तुम्हाला मतदानाद्वारे धोबीपछाड दिल्याशिवाय राहणार नाही.

 

विधानसभेतही नितीशकुमारांना दे धक्का

 

एका लोकसभेसह दोन विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.
 
- विधानसभेच्या जहानाबाद मतदारसंघातून आरजेडीचे सुदय यादव यांनी नितीशकुमार यांच्या जेडीयूचे उमेदवार अभिराम शर्मा यांचा तब्बल 35 हजार मतांनी दारूण पराभव केला आहे.

 

- भबुआ विधानसभा मतदारसंघात भाजपच्या रिंकी राणी पांडेय यांनी काँग्रेसचे उमेदवार शंभू सिंह पटेल यांच्यावर 15 हजार 490 मतांनी विजय मिळवला. 

 

का होतेय या मतदारसंघात पोटनिवडणूक-

 

1. अररिया, लोकसभा सीट- राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चे खासदार तस्लीमुद्दीन यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे.


2. जहानाबाद, विधानसभा सीट- आरजेडी आमदार मुद्रिका सिंह यादव यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक झाली. 


3. भभुआ, विधानसभा सीट- भाजपचे आमदार आनंद भूषण पांडेय यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक झाली. 

बातम्या आणखी आहेत...