आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PNB घोटाळा यूपीएच्या काळातील, आम्ही वेगाने कारवाई केल्यानेच आला समोर : भाजप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्मला सीतारमण यांनी शनिवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. - Divya Marathi
निर्मला सीतारमण यांनी शनिवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला.

नवी दिल्ली - पीएनबी घोटाळ्यावरूव भाजप आणि काँग्रेस आमने-सामने उभे ठाकले आहेत. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी स्वतःच्या सरकारचे संरक्षण केले. त्यांनी माध्यमांशी बोलताना हा प्रश्न केला की, ही चोरी 2011 मध्ये म्हणजे काँग्रेस (यूपीए) च्या काळात झाली आहे. आता आम्ही कारवाई करतोय म्हणून घोटाळा समोर आला. याचे अनेक पुरावे आहेत. त्यानुसार काँग्रेसला प्रश्न विचारायला पाहिजे. तसे झाले तरच जनतेला सत्य समजेल. सरकार आरोपी नीरव मोदीला पकडण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावत आहे. दुसरीकडे काँग्रेसने म्हटले, देशाचे चौकीदार पकोडे तळण्याचा सल्ला देत आहेत. आज तर अशी स्थिती आहे की, चौकीदार झोपलेला राहिला आणि चोर पळून गेला. 

 

काय म्हणाल्या सीतारमण
- निर्मला सीतारमरण म्हणाल्या, या प्रकरणात सरकारने वेगाने कारवाई केली आहे. 13 सप्टेंबर 2013 ला राहुल गांधी नीरव मोदीच्या ज्वेलरी ग्रुपच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. 
- सीतारमण म्हणाल्या की, काँग्रेसने हीच रणनीती वापरली आङे. यूपीएने हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. 2013 मध्ये या घोटाळ्याच्या विरोधात आवाज उचलण्यात आळा तो अर्थ मंत्रालयाकडून दाबण्यात आला. 


अनिता सिंघवींशी व्यावसायिक नाते 
- निर्मला सीतारमण म्हणाल्या, फायर स्टार डायमंड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिडेट ही नीरव मोदी चालवत असलेल्या कंपन्यांपैकी एक आहे. मुंबईच्या लोअर परेलमध्ये ट्रेड पॉइंट बिल्डिंगमध्ये अद्वैत होल्डिंग लिमिडेटची एक प्रॉपर्टी त्यांनी लीजवर घेतली होती. 2002 पासून अनिता सिंघवी याच्या शेयर होल्डर्समध्ये होत्या. तुम्हाला माहिती आहे त्या कोणाच्या पत्नी आहेत. त्याशिवाय आविष्कार मानस सिंघवीही शेयर होल्डर आहेत, तो त्यांचा मुलगा असू शकतो. वरिष्ठ काँग्रेस नेत्यांपैकी एकाच्या पत्नीही यात शेअर होल्डर आहेत. 


कांग्रेसने म्हटले देशाचा चौकीदार झोपलेला 
- कपिल सिब्बल म्हणाले, आपल्या देशाचा जो चौकीदार आहे तो पकोडे तळण्याचा सल्ला देतो. आता तर अशी अवस्था झाली आहे की, चौकीदार झोपतोय आणि चोर पळून गेला. मोदी त्याच्याबरोबर ऑफिशिल दौऱ्यांमध्ये जाणाऱ्यांच्या नावाचा खुलासा का करत नाहीत? पंतप्रधान याच ईज ऑफ डुइंग बिझेनस बद्दल बोलतात का?  
- दावोसमध्ये पीएनबी स्कॅमचे मुख्य आरोपी नीरव मोदी यांच्याबरोबर पंतप्रधान मोदींचा एक ग्रुप फोटो घोटाळ्यानंतर समोर आला आणि व्हायरल झाला होता. काँग्रेसने याच फोटोच्या आधारे भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...