आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघ दहशतवादी संघटना नाही, त्यामुळे प्रणवदांच्या जाण्यात गैर काय- नितीन गडकरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट झाली होती. (फाइल) - Divya Marathi
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट झाली होती. (फाइल)

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सहभागी होण्यावरुन आता वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने म्हटले आहे, की माजी राष्ट्रपतींनी संघाला कधीही चांगले म्हटलेले नाही. या संघटनेच्या कार्यपद्धतीवर आणि भ्रष्टाचारावर त्यांनी आवाज उठवलेला आहे. संघ जर अशा विचारधारेचा अतिथी बोलवत असतील तर ते त्यांच्या विचारांशी सहमत आहेत का, असा सवाल काँग्रेसने केला आहे. त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले संघ काही पाकिस्तानातील दहशतवादी संघटना नाही, ज्यामुळे काँग्रेसला त्रास होत आहे. 

 

काँग्रेस नेते संदीप दीक्षित  मंगळवारी म्हणाले होते, 'प्रणव मुखर्जी हे काँग्रेस नेते असताना त्यांनी अनेकदा आरएसएसवर हल्लाबोल केला आहे. त्यांच्या दृष्टीने संघ ही टाकाऊ संघटना आहे. यासारखी वाईट संघटना देशात दुसरी नाही. संघाच्या भ्रष्टाचारावरही त्यांनी आवाज उठवला होता. त्यांच्या मते अशा संघटनेला देशातून बाहेर फेकले पाहिजे. आरएसएस जर अशा विचारधारेच्या व्यक्तीला प्रमुख अतिथी म्हणून बोलावत असेल तर, त्याचा अर्थ ते आता त्यांच्या विचारांशी सहमत झाले आहेत.'

 

'दुसऱ्या विचारधारेच्या लोकांना भेटण्यात गैर काय' 
- काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उत्तर दिले आहे. गडकरी म्हणाले, 'संघाने प्रणव मुखर्जींना निमंत्रणपत्र पाठवले, ते त्यांनी स्वीकारले आहे. ही वैयक्तिक बाब आहे. देशात राजकीय अस्पृष्यता पाळायची गरज नाही. आपण प्रत्येक विचारधारेच्या लोकांना भेटले पाहिजे. त्यांचे ऐकून घेतले पाहिजे. यात काहीही गैर नाही. प्रणव मुखर्जींनी संघाचे निमंत्रण स्वीकारले, ही चांगली बाब आहे. यात कोणाला त्रास होण्याचे काहीच कारण नाही. आरएसएस राष्ट्रवादी संघटना आहे, ती काही आयएसआयएस नाही.'
- गडकरी म्हणाले, 'मी जेव्हा भाजप अध्यक्ष झालो तेव्हा कम्यूनिस्ट पक्षाच्या मुख्यालयात गेलो होतो. नागपूरला एबी बर्धन राहात होते, मी त्यांना माझे राजकीय गुरु मानायचो, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी गेलो होतो, ही वैयक्तिक बाब आहे.'

 

इंदिरा गांधींनीही केले होते संघाचे कौतूक 
- भाजप नेते राज्यसभा खासदार सुब्रमण्याम स्वामी म्हणाले, मुखर्जी आता निवृत्त झाले आहेत. ते आधी काँग्रेसमध्ये होते, मात्र काय ते बदलू शकत नाही. परिस्थिती बदलत असते. पंडित जवाहरलाल नेहरुंनी संघाला म्हटले होते, की प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात तुमची एक तुकडी पाठवत जा, लालबहादूर शास्त्रींनी देखील असे म्हटले होते. मोरबी येथे आलेला पूर आणि भूकंपानंतर संघाने केलेल्या कामाचे इंदिरा गांधींनीही कौतूक केले होते. 


राष्ट्रातील प्रमुख व्यक्तींना निमंत्रीत करण्याची परंपरा 
- आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, ज्यांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी दिले आहे आहे, देशातील अशा प्रमुख व्यक्तींना कार्यक्रमाचे मुख्य अतिथी करण्याची आरएसएसची परंपरा राहिली आहे. त्याच परंपरेत माजी राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात आले आहे. त्याचा त्यांनी स्वीकार केला आहे. 
- त्यांनी सांगितले, की समारोप सोहळ्याला प्रणव मुखर्जींसह सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहाणार आहेत. 25 दिवस चालणाऱ्या या शिक्षा वर्गात 700 स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...