आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: कमळाच्या थीमवर BJP चे नवे कार्यालय, हे आहे वैशिष्ट्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील एका आर्किटेक्ट कंपनीने भाजपचे कार्यालय डिझाइन केले आहे. येथे कमळाच्या आकाराचा एक तलाव करण्यात आला आहे. - Divya Marathi
मुंबईतील एका आर्किटेक्ट कंपनीने भाजपचे कार्यालय डिझाइन केले आहे. येथे कमळाच्या आकाराचा एक तलाव करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - भाजपचा पत्ता बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या नव्या मुख्यालयाचे रविवारी उद्घाटन केले. पक्षाचे नवे कार्यालय 6, दीनदयाल उपाध्याय मार्गावर तयार करण्यात आले आहे. लाल दगडांनी ही इमारत बांधण्यात आली आहे. भाजपचे मुख्यालय 18 महिन्यांमध्ये उभे राहिले आहे. भाजपच्या मुख्यालयात सर्व अत्याधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध आहेत. पक्षाध्यक्ष अमित शहांनी दावा केला की जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे हे सर्वात मोठे कार्यालय आहे. 

 

- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एवढ्या कमी वेळात इमारत उभी केल्याबद्दल अमित शहा आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. पंतप्रधान म्हणाले, 'आज श्यामा प्रसाद मुखर्जी आणि दीनद्याल उपाध्याय यांच्या आत्म्याला शांती लाभली असेल. त्यांनी लावलेल्या रोपाचा आज वटवृक्ष झाला आहे.'
- मोदी म्हणाले, 'मोदी म्हणाले भाजप हा 100 टक्के लोकशाहीवादी पक्ष आहे. येथे निर्णय घेण्यापासून तो लागू करेपर्यंत सर्वांची मते जाणून घेतली जातात. आमचा पक्ष देशभक्तीच्या रंगात रंगलेला आहे. आमच्या पक्ष कार्यालयाची सीमा ही जिथपर्यंत भारत आहे तिथपर्यंत आहे. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे हे कार्यालय आहे.' 

 

पक्षाध्यक्षांचे ऑफिस तिसऱ्या मजल्यावर 
- भाजपच्या नव्या मुख्यालयातील ग्राउंड फ्लोअरवर भाजप आणि जनसंघातील नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. याच मजल्यावर भाजपच्या आठ प्रवक्त्यांचे कार्यालय आहे. 
- अध्यक्षांचे कार्यालय तिसऱ्या मजल्यावर आहे. दुसऱ्या मजल्यावर पक्षाचे महासचिव, सचिव, उपाध्यक्षांचे कार्यालय आहे. 
- पत्रकार परिषदेसाठीचा हॉल ग्राऊंड फ्लोअरवरच तयार करण्यात आला आहे. येथे नियमीत ब्रीफिंग केले जाणार आहे. 

 

लुटियन्स सोडणारा भाजप पहिला पक्ष 
- भाजपचे कार्यालय 11, अशोका रोड येथे होते. अशी माहिती आहे की आता पक्ष ही जागा सरकारला परत करणार आहे. ही जागा सरकारच्या वतीने भाजपला कार्यालयासाठी देण्यात आली होती. लुटियन्स झोन बाहेर पक्ष कार्यालय सुरु करणारा भाजप हा पहिला राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. 
- सुप्रीम कोर्टानेही राजकीय पक्षांना लुटियन्स झोनबाहेर कार्यालय सुरु करण्याचे आदेश दिलेले आहेत. 

 

कमळाच्या थीमवर आहे इमारत 
- पक्ष मुख्यालयात तीन ब्लॉक आहेत. मुख्य इमारत सात मजली आहे. 
- इतर दोन इमारती या तीन-तीन मजली आहेत. संपूर्ण इमारत वाय-फायने अद्ययावत आहे. 
- इमारतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या इमारतीवर सोलर पॅनल असून इमारतीत बायो टॉयलेट व्यवस्था आहे. 
- भाजपची नवी इमारत ही पक्षाचे निवडणुक चिन्ह कमळाच्या थीमवर तयार करण्यात आली आहे. 
- इमारतीमध्ये पावसाच्या पाण्याचेही व्यवस्थापन करण्यात आले आहे. 
- 200 कारसाठी अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था आहे. 
- तीन इमारतींच्या या मुख्यालयात ग्रंथालय, रिसर्च रुम आहे. 
- सर्वात महत्त्वाची असलेली भाजपची वॉर रुम देखील येथे आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, भाजप कार्यालयचा फेरफटका मारताना पंतप्रधान मोदी...

बातम्या आणखी आहेत...