आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोठी बातमी: 2019 साठी अमित शहांचा असा आहे मास्टरप्लॅन BJP President Amit Shah Prepares Master Plan For 2019 Lok Sabha Election

मिशन 2019: BJP चा मास्टरप्लॅन, लोकसभेच्या सर्व जागांसाठी अमित शहांचा मोठा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 2019 लोकसभा निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षाने देशातील सर्वच 543 लोकसभा जागांसाठी एक मास्टरप्लॅन आणला आहे. भाजप सर्वच्या सर्व 543 जागांवर एक इंचार्ज नियुक्त करणार आहे. याशिवाय प्रत्येक राज्यात 11 सदस्यांची 'निवडणूक तयारी टीम' नियुक्त होईल. 

 

भाजपचा मास्टरप्लॅन!

एका रिपोर्टनुसार, 543 जागांवर नियुक्त केले जाणारे हे इंचार्ज वा प्रभारी त्या लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरचे असतील. 11 सदस्यांची ही निवडणूक तयारी टीम राज्यांशी संबंधित 13 महत्त्वाच्या मुद्द्यांवर फोकस करेल. भाजपच्या मास्टरप्लॅनशी संबंधित दोन वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली आहे. प्रत्येक लोकसभा जागेसाठी एक इंचार्ज नियुक्त करण्याची भाजपची ही पहिलीच वेळ आहे. बसपाने हा फॉर्म्युला अनेक वर्षांपासून अमलात आणलेला आहे. नेते म्हणाले की, विशेष टीमची स्थापना लोकसभा निवडणुकीचे मैदान तयार करण्यासाठी झाली आहे.

 

संघटनेवर भर, 2014 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य
हे नेते म्हणाले की, मोदी-शहा जोडीला 2019ची निवडणूक 2014 पेक्षाही जास्त अंतराने जिंकायची आहे. एक नेता म्हणाले- "मोदी-शहांचे संघटनेवर जास्त लक्ष केंद्रित आहे, 2019 निवडणुकीआधी संघटनेतील कच्चेदुवे दूर होतील." भाजपने प्रत्येक राज्याला तेथील सामाजिक मुद्द्यांवर रिपोर्ट तयार करायला सांगितले आहे. याशिवाय राजकीय परिस्थिती, विरोधकांची रणनीती, आघाडीच्या शक्यता, सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची यादी तयार करायला सांगितले आहे. राज्य युनिटला एक विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ती म्हणजे- आगामी काळात भाजप प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणे.
पक्षाध्यक्ष अमित शहा लवकरच प्रत्येक राज्याचा दौरा करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य युनिटला विशेष तयारी करण्याबाबत सांगण्यात आले आहे.

 

प्रत्येक लोकसभा जागेसाठी एवढी तयारी
प्रभारी अथवा इंचार्जशिवाय प्रत्येक लोकसभा मतदारसंघात भाजप 3 सदस्यांची सोशल मीडिया टीम, 3 सदस्यांची मीडिया टीम, 3 सदस्यांची लीगल टीमही देणार आहे. भाजप नेते म्हणाले की, दोन आणखी सदस्यांची टीम असेल जी केंद्र तसेच राज्यांच्या योजना व्यवस्थित सुरू आहेत का ते पाहील. 
अमित शहा त्यांच्या दौऱ्यामध्ये राज्यातील 11 सदस्यांच्या निवडणूक तयारी टीमचे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन घेतील. अमित शहा आरएसएस, पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्याही भेटी घेतील. गत लोकसभेत भाजपला जेथे विजय मिळाला नव्हता, तेथील इंचार्जचीही अमित शहा भेट घेणार आहेत. भाजपचे एक नेते म्हणाले की, अमित शहा यांच्या मीटिंगनंतर पक्षाच्या प्रत्येक महासचिवाला विशेष राज्याचा दौरा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हे महासचिव अमित शहा यांच्या बैठकीनंतर फॉलोअप बैठक घेतील. 

 

बातम्या आणखी आहेत...