आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा राहुल गांधींवर वंदेमातरमचा अवमान केल्याचा आरोप, थोडक्यात संपवायला सांगितले गीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नवी दिल्ली - भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर 'वंदेमातरम'चा अपमान केल्याचा आरोप केला आहे. भाजपचा आरोप आहे की राहुल गांधींनी कर्नाटकातील एका सभेत 'वंदेमातरम' थोडक्यात संपवण्याचे आदेश दिले होते. याचा एक व्हिडिओ भाजपने पोस्ट केला आहे. पुढील महिन्यात 12 तारखेला कर्नाटक विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. 
 
 त्यामुळेच आम्ही त्यांना शहजादा म्हणतो - संबित पात्रा 
 - भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विट केले आहे. कर्नाटकातील रॅली दरम्यान राहुल गांधी यांनी वंदेमातरम एका ओळीत संपवण्याचे आदेश दिले होते. हेच कारण आहे की आम्ही त्यांना शहजादा म्हणतो. त्यांना वाटते की हा देश त्यांची पारिवारिक संपत्ती  आहे. ते त्यांच्या इच्छेनुसार वंदेमातरम् मध्ये बदल करु शकतात. 
 
 काँग्रेसचे स्पष्टीकरण 
 - भाजपच्या आरोपांवर काँग्रेस नेते बृजेश म्हणाले, की कार्यक्रमात एकदा वंदेमातरम् झालेले होते. त्यामुळे राहुल गांधींनी दुसऱ्यांदा एका ओळीत संपवण्यास सांगितले. त्यात वादाचे काही कारण नाही. 
 
 काय आहे प्रकरण 
 - भाजपने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेसची सभा सुरु असल्याचे दिसते. 
 - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के.सी.वेणुगोपाल हे राहुल गांधींना वंदेमातरमसाठी उभे राहाण्याची विनंती केली. त्यावर ते म्हणाले, प्लीज लवकर उरकून घ्या. 
बातम्या आणखी आहेत...