आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेट-टॉप बॉक्समध्ये चिप लावून टीव्हीवर नजर ठेवणार सरकार, ट्रायला पाठवला प्रस्ताव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीएआरएसीने 22,000 घरांमध्ये बीएआर-ओ मीटर लावलेले आहेत. त्यामाध्यमातून ते टीआरपीचे आकडे गोळा करतात. (फाइल) - Divya Marathi
बीएआरएसीने 22,000 घरांमध्ये बीएआर-ओ मीटर लावलेले आहेत. त्यामाध्यमातून ते टीआरपीचे आकडे गोळा करतात. (फाइल)

नवी दिल्ली - तुम्ही कोणते चॅनल कितीवेळ पाहता, हे समजण्यासाठी सरकार नव्या सेट टॉप बॉक्समध्ये चिप लावण्याच्या तयारीत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी (ट्राय) कडे हा प्रस्ताव पाठवला आहे. स्मृती ईराणी यांच्या मंत्रालयाशी संलग्न असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांचा उद्देश प्रत्येक चॅनलला नेमकी किती व्ह्यूअरशिप आहे हे पाहणे हा आहे. दुसरीकडे सरकारचे हे पाऊल ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौंसिल इंडिया ऑफ इंडिया (बार्क) चा एकाधिकार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न असल्याचेही समजले जात आहे. बार्क भारतात दर आठवड्याला टीव्ही व्ह्यूअरशिपचा डेटा सार्वजनिक करत असते. त्यात दूरदर्शनची व्ह्यूअरशिप कमी सांगितली जाते, असे मंत्रालयाचे म्हणणे आहे. 


ट्रायने म्हटले, चिप लावण्याच्या मुद्द्यावर मंत्रालयाने स्वतंत्र संदर्भ पाठवावा 
डीएव्हीपी विविध मंत्रालये आणि त्यांच्या संघटनांच्या जाहिराती देणारी सरकारची नोडल एजन्सी आहे. मंत्रालयाने नव्या डीटीएच लायसन्सशी संबंधित अनेक मुद्द्यांवर ट्रायने केलेल्या शिफारसींवर प्रतिक्रिया म्हणून हा प्रस्ताव ठेवला आहे. पण नुकत्याच पाठवलेल्या उत्तरात ट्रायने म्हटले आहे की, सेट-टॉप बॉक्समध्ये चिप लावण्याच्या मुद्द्यावर मंत्रालयाला स्वतंत्र संदर्भ पाठवावा लागेल. 


टीआरपीचा योग्य आकडा मिळण्यासाठी चिप 
चिपच्या माध्यमातून सहजपणे ग्राहक कोणते चॅनल कितीवेळ पाहत आहे, याची माहिती मिळवता येईल. त्यातून जाहिरातदार आणि डीएव्हीपीला त्यांच्या जाहिरातींवर विचारपूर्वक खर्च करता येईल. तसेच मोठ्या प्रमाणावर ज्या वाहिन्या पाहिल्या जातात त्यांनाच प्रोत्साहन मिळेल. 


सध्या 22 हजार घरांतून मिळतात टीआरपीचे आकडे 
सध्या बीएआरएसीने 22,000 घरांमध्ये बीएआर-ओ मीटर लावलेले आहेत. त्याद्वारे टीआरपीचे आकडे मिळवले जातात. पण नवीन चिप लावल्यानंतर या मीटरची गरज पडणार नाही. बार्क हे मीटर ग्राहकाच्या परवानगीने त्यांच्या घरात लावते. 


कारण : आकडे कसे समोर येतात हे बार्क सांगत नाही  
- मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बार्क त्यांना व्ह्यूअरशिपचे आकडे कसे मिळतात हे सांगत नाही. त्यांची प्रक्रिया आणि सर्वेचा भाग कोणता हेही सांगितले जात नाही. चिप लावल्यानंतर आकडे समोर येतील. मात्र बार्कच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, वेळो वेळी ते मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना कामाचे अपडेट्स देत असतात. 


अडचण : विना परवानगी सरकारकडे जाईल डेटा 
नवीन चिप लावल्यानंतर आता सर्व ग्राकांचा डेटा सरकार मिळवेल. पण त्यासाठी ग्राहकांची परवानगी घेतली जाणार नाही. आतापर्यंत मात्र असे होत नव्हते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...