आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 Death Mystery: 10 जणांच्या मृत्यूचे रहस्य उलगडले, रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बुराडीमध्ये 11 पैकी 10 जणांच्या मृत्यूचे गूढ उलगडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांना मंगळवारी रात्री उशिरा भाटिया फॅमिलीतील 10 जणांची पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाली आहे. अद्याप ललितची आई नारायणी देवी यांची पोस्टमार्टम रिपोर्ट मिळालेली नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये खुलासा झाला आहे की, 10 जणांचा मृत्यू गळफास लावल्यानेच झज्ञला आहे. यातील काही जणांच्या मानेचे हाडही मोडले होते.

 

पोलिसांना मिळाली पोस्टमॉर्टम रिपोर्ट 

भाटिया कुटुंबातील 11 जणांच्या मृतदेहांचे मौलाना आजाद मेडिकल कॉलेजच्या 3-3 डॉक्टरांच्या दोन मेडिकल बोर्डांनी पोस्टमार्टम केले होते.
गुन्हे शाखेच्या एका सीनियर अधिकाऱ्याने सांगितले की, भाटिया कुटुंबातील 11 पैकी 10 जणांची पोस्टमॉर्टम रिपोर्ट तपास करत असलेल्या डीसीपी डॉ. जॉय टर्की यांना मिळाली आहे.

यावरून खुलासा झाला आहे की, शरीरावर जखमांच्या खुणा नव्हत्या. हत्येसारखी कोणतीही बाब समोर आलेली नाही. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, डॉक्टरांनी सांगितले की, नारायणी देवी यांची पोस्टमॉर्टम रिपोर्ट एक-दोन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. याप्रकरणी आता पोलिसांची कारवाई वेगवान होण्याची शक्यता आहे.

 

तपासणीसाठी व्हिसेरा पाठवणार

पुढील एक-दोन दिवसांत 11 जणांचा व्हिसेरा फॉरेन्सिक तपासणी पाठवण्यात येणार आहे. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी हस्ताक्षराचे नमुने गोळा करणे सुरू केले असून, त्यावरून घरातील रजिस्टरवरील लिखाण कुणाचे आहे हे तपासले जाणार आहे.

यासाठी पोलिसांनी बुराड़ी येथील एक शाळा, बँक आणि तिमारपुर येथील शाळेतील अक्षराचे नमुने मिळवण्यासाठी पत्र पाठवले आहे. तिमारपुरच्या शाळेत भाटिया कुटुंबातील मुले शिवम आणि ध्रुव शिक्षण घेत होते. पोलिसांनी प्रियंकाच्या ऑफिसमध्येही पत्र लिहून तिच्या अक्षराच्या नमुन्याची मागणी केली आहे.

 

पोलिसांना मिळाली गुमनामी चिठ्ठी
अशी चर्चा आहे की, पोलिस आणि एका माध्यम संस्थेला हे पत्र मिळाले आहे. पत्र लिहिणाऱ्याने दावा केला आहे की, त्याची भाटिया कुटुंबाशी चांगली ओळख आहे आणि त्याने करालामधील एका तांत्रिकाकडे त्यांचे येणे-जाणे असल्याचे पाहिले आहे. पत्र पाठवणाऱ्याने स्वत:ला करालाचा रहिवासी असल्याचे सांगितले आहे. तथापि, पोलिसांनी असे कोणतेही पत्र मिळाल्याचे नाकारले आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाशी संबंधित आणखी Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...