आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Burari Case There Were Twelve People In House Not Eleven At The Time Fo Incident

#Burari प्रकरणी खळबळजनक दावा : घरात 12 जण होते, 11 ची आत्महत्या, मुलीचा शोध सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बुराडी प्रकरणामध्ये रोजच काहीतरी नवीन माहिती समोर येत असल्याचे चित्र आहे. 11 लोकांच्या सामुहिक आत्महत्येचे गूढ त्यामुले दिवसेंदिवस वाढत आहे. एता एक नवी खळबळजनक माहिती सुत्रांकडून समजतेय. ही माहिती म्हणजे घरात त्यादिवशी 12 लोक होते. त्यापैकी 11 जणांचा फाशीमुळे मृत्यू झाला होता. तर 12 वी व्यक्ती एक मुलगी होती, तिचा शोध पोलिस घेत आहेत. रजिस्टरमध्ये तिच्या नावाचा उल्लेख असल्याची माहिती मिळतेय. 


ललितने लिहिले मिस्ट्री गर्लचे नाव 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी ललितची पत्नी टिना यांची नातेवाईक आहे. त्या तरुणीचे कुटुंब आर्थिक संकटामुळे त्रस्त असल्याचा उल्लेख रजिस्टरमध्ये होता. ललितने त्या मुलीलाही सोबत हा विधी करण्याचा सल्ला दिला होता. ही तरुणीही ललितच्या घरी येऊन पुजेत सहभागी झाली असावी असा संशय आहे. ललितनेच डायरीत लिहिले मिस्ट्री गर्लचे नाव लिहिले असल्याचेही समोर येत आहे. 


सुरुवातील सामुहिक हत्याकांड की सामुहिक आत्महत्या असा गुंता असलेल्या या प्रकरणाच्या तपासादरम्यान  सापडलेल्या पुराव्यांमध्ये धार्मिक बाबींचा उल्लेख आढळत गेला. हळू हळू हे प्रकरण अंधश्रद्धेतून सामुहित आत्महत्या असल्याचे स्पष्ट होत गेले. या प्रकरणी आता आणखी एका व्यक्तीचे नाव जोडले जात असल्याने हा गुंता अधिक वाढत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...