आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Burari Case ला खळबळजनक वळण: काहींची हत्या झाल्याचा फॉरेन्सिक एक्स्पर्टना संशय, पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  बुराडीच्या संतनगरमधील घरात 11 जणांच्या गूढ मृत्यू प्रकरणाला खळबळनक वळण लागले आहे. फॉरेन्सिक एक्स्पर्टनी काहींची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केल्याने सामूहिक आत्महत्येच्या थेअरीवर तपास करणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. दुसरीकडे, नव्या खुलाशानुसार ललित भाटिया आपल्या मृत वडिलांसोबत कुटुंबातील आणखी 7 जणांच्या आत्मांना मोक्ष द्यायचा होता. रजिस्टरमध्ये एका नोटमध्ये त्याने याचा उल्लेख केला आहे. ललित त्याच्या मृत वडिलांनी स्वप्नात येऊन दिलेले दृष्टांत रजिस्टरमध्ये लिहून घ्यायचा व त्यांचे पालन करायचा, असे सांगितले जात आहे.

 

वडिलांसोबत आणखी 7 आत्मांना ललितला द्यायचा होता मोक्ष

ललितने रजिस्टरमध्ये 9 जुलै 2015 रोजी लिहिले होते, "तुम्ही क्रियेच्या गतीमध्ये सुधारणा वाढवा, तुम्ही भटकत आहात. सर्वांनी एका छताखाली मिळून-मिसळून ती सुधारा. अजून 7 आत्मा माझ्यासोबत भटकत आहेत. क्रियेत सुधार कराला, तर गती वाढेल. मी या गोष्टीसाठी भटकत आहे, असेच सज्जन सिंह, हिरा, दयानंद, कर्मचंद, राहुल, गंगा आणि जमुना देवी माझे सहकारी बनलेले आहेत. त्यांनाही हेच पाहिजे की, तुम्ही सर्वांनी चांगले कर्म करून आयुष्य सफल बनवावे. जेव्हा आमचे काम पूर्ण होईल, तेव्हा आम्ही परत जाऊ." 
रजिस्टरनुसार, यासाठी ललितने शनिवार-रविवारी रात्री एका कपात पाणीही ठेवले होते. रजिस्टरमध्ये लिहिले की, कपातील पाण्याचा रंग जसजसा बदलेल, तसतसे त्या सदस्यांना मोक्षाची प्राप्ती होईल.

 

रजिस्टरमध्ये बहुतांश गोष्टी प्रियंकाने लिहिल्या : 
क्राइम ब्रँचला ललितच्या घरातून 5 जून 2013 ते 30 जून 2018 पर्यंत लिहिलेले 11 रजिस्टर आढळले आहेत. यात 4 वेगवेगळे हस्ताक्षरे आहेत. बहुतांश बाबी ललितची भाची प्रियंकाने लिहिल्या आहेत. पोलिस एक्स्पर्टकडून इतर लिखाणही तपास आहेत. क्राइम ब्रँचचे जॉइंट कमिश्नर आलोक कुमार म्हणाले की, रजिस्टर में लिहिलेल्या बाबी मनोविकारतज्ज्ञांनाही दाखवल्या जातील. या कुटुंबाची मनोस्थिती कोणत्या पातळीवर गेली होती, हे पोलिसांना जाणून घ्यायचे आहे.

 

ध्रुव आणि शिवमचे हात बळजबरी बांधण्यात आले होते: 
ललित आणि भूपीचा मुलगा ध्रुव तसेच शिवमच्या हातांवर खोल जखमा आढळल्या आहेत. यावरून या दोघांनी या साधनेला विरोध केला असेल, असे पोलिसांचे मानणे आहे. त्यामुळेच त्यांचे हात बळजबरी बांधण्यात आल्याची शक्यता वाटते.

 

70 हून जास्त जणांची होणार चौकशी
क्राइम ब्रँचच्या टीमने गुरुवारी मृत कुटुंबातील 8 नातेवाइकांना नोटीस जारी केली. त्यांना ललितच्या मनोदशेबाबत चौकशी केली जाईल. क्राइम ब्रँचने चौकशीसाठी त्या 60 जणांचीही यादी बनवली आहे, जे व्यवसायानिमित्त नेहमी ललितशी मोबाइलवर संपर्कात राहायचे. शेजाऱ्यांकडूनही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे की, घटनेपूर्वी कुटुंबातील सदस्यांचा व्यवहार नॉर्मल होता की बदलला होता.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाशी संबंधित आणखी Photos...