आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Burari : 'मोक्ष' मिळण्यासाठी करत होते रिहर्सल, विश्वास होता वडिल येऊन सर्वांना सोडवतील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  बुराडीमध्ये 1 जुलैला एकाच कुटुंबातील 11 जणांच्या सामुहिक हत्येप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. घरातून मिळालेल्या रजिस्टर आणि डायरींवरून भाटिया कुटुंबाने 'मोक्ष' प्राप्तीसाठी अनेकदा रिहर्सल केल्याचे समोर आले आहेत. पोलिसांच्या मते घटना घडली त्या रात्रीही रिहर्सलच सुरू होती. फाशी लागली तरी वडील म्हणजे मृत गोपाल दास यांची आत्मा त्यांना सोडवायला येईल असा त्यांना विश्वास होता. 


20 हून अधिक डायऱ्या रजिस्टर जप्त 
- पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार 2007 मध्ये घरातील लहान मुलगा ललित भाटिया यांचे वडील गोपाल दास यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ते ललितच्या स्वप्नात यायचे आणि ते जे काही सांगतील ते ललित रजिस्टरमध्ये लिहू लागला. नंतर ते रजिस्टर देवघरात ठेवले जायचे. दुसऱ्या दिवशी कुटुंबीय तसेच सर्वकाही करायचे. 
- एका न्यूज रिपोर्टनुसार ललितची मुले नेहमी शाळेतील मित्रांना सांगायचे की आज पुन्हा बाबांच्या अंगात  आजोबा यायचे. 
- आतापर्यंतच्या चौकशीत समोर आले आहे की, 2007 पासूनच ललित वडील सांगतील ते रजिस्टरमध्ये लिहायचा. पोलिसांना असे 20 हून अधिक रजिस्टर आणि डायऱ्या सापडल्या आहेत. 


ललितने सर्वांना असे घेतले विश्वासात 
- ललितबाबत तपास करताना पोलिसांना एक नवी गोष्ट सापडली. 12 वर्षांपूर्वी त्याने आवाज गमावला होता. त्यांच्या घरात चोरीसाठी आलेल्या चोरांनी त्याचा गळा दाबल्याने असे झाले होते. त्यानंतर त्याचा उपचार सुरू होता. 
- डॉक्टरांनी सांगितले की, मानेच्या नसा दुबळ्या झाल्याने त्याचा आवाज गेला आहे. एकिकडे त्याचा उपचार सुरू होता, त्याचवेळी त्याला कल धार्मिक गोष्टींकडे वाढला. ललितचे बोलणे पूर्णपणे बंद झाले होते. 6 महिने अशीच स्थिती राहिली. त्यानंतर त्याचे वडील गोपाल दास यांचा मृत्यू झाला. 
- त्यांच्या मृत्यूनंतर अचानक ललितचा आवाज परतला आणि तो बोलू लागला. पण तो आता वडिलांसारखे बोलायला लागला होता. वडिलांचा तेरावा होताच ललितचा आवाजही परत आला होता. 
- भाटिया कुटुंबासाठी हे सर्व चमत्कारासारखे होते. त्यानंतर ललितची धार्मिक आस्था वाढली आणि तो जास्त पुजा, वगैरे करू लागला. संपूर्ण कुटुंबालाही ललितवर विश्वास होता. ललितच्या नीकटवर्तीय नातेवाईकांनीच पोलिसांना ही माहिती दिली आहे. 
- डायरीतील मजकुरानुसार, 'श्रद्धेमध्ये ताळमेळ आणि एकमेकांना सहकार्य असणे गरजेचे असते. विश्वासाने आणि दृढपणे करा. मध्यम प्रकाशाचा वापर करायचा आहे. कुटुंबीयांना ज्याठिकाणी फाशी घेतली त्याच्या वरच्या भागात जाळी लावलेली होती. त्यामुळे त्याठिकाणी प्रकाशही कमी होती. 
- हे सर्व याकडे इशारा करते की, ललितने वडिलांच्या आत्म्याच्या सांगण्यावरून जेकाही लिहिले होते, ते सर्व रविवारच्या घटनेशी मिळते जुळते होते. 


10 स्टूल केले खरेदी 
- पोलिसांनी सांगितले की, या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच ललितने 10 स्टूल खरेदी केले होते. साधारणपणे कोणीही एवढे स्टूल खरेदी करत नाही. त्याशिवाय सर्वांना वेगवेगळ्या रंगाच्या ओढणीही होत्या. एवढ्या ओढण्यांची गरज काय होती. हेही सामुहित 'मोक्ष' प्राप्तीसाठी हा प्रकार केल्याचे संकेत आहेत. 
- पोलिसांच्या मते, ललितला शेअर्ड सायकोथिक डिसऑर्डर म्हणजे डिल्यूशनल आजार होता. हा आजार असलेले लोक ज्या काल्पनिक गोष्टींना सत्य मानत असतात हे इतरांनाही खरे वाटते. 
- तर सोसायटी फॉर क्लिनिकल रिसर्च ऑफ इंडियाचे संयोजक डॉ. विकास धिकव यांच्या मते, या सर्वांना कनव्हर्जन सिंड्रोम होता. हा सिंड्रोम असणारे लोक प्रचंड धार्मिक असतात. अशा धार्मिक विधींसाठी ते एकमेकांना प्रोत्साहन देतात.  


FIR नुसार ललितचेही हात-तोंड बांधलेले होते 
- आतापर्यंत असे समोर येत होते की, ललितचे हात मोकळे होते. पण FIR मध्ये ही बाब पलटली आहे. पोलिसांना ललितचे हात आणि तोंडही बांधलेले मिळाले. शुभम (तोंड, हात व डोळे), टीना (तोंड), भुवनेश (पाय आणि डोळ्यांवर पट्टी), प्रियांका (हात-तोंड व डोळे), नीतू (हात-पाय आणि डोळे), मोनू (पाय), ध्रुव (पाय, तोंड आणि डोळे), सविता (पाय, तोंड ) आणि प्रतिभाचे हात कमरेला बांधलेले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...