आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Burari : समोर आले '5 आत्मा'चे रहस्य, 'बीडी बाबा' नावाच्या तांत्रिकाबाबतही मिळाली माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नई दिल्ली - बुराडीमध्ये झालेल्या 11 जणांच्या सामुहिक मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता पोलिसांनी दावा केला आहे की, भाटिया हाऊसमधून हाती लागलेल्या डायरींमध्ये ज्या '5 आत्मा' चा उल्लेख होता, त्यांची ओळख समोर आली आहे. पोलिसांच्या मते, डायरीत असे लिहिले आहे की, कुटुंबाला डायरीतील निर्देशांचे पालन न केल्याची शिक्षा मिळाली. तसेच 'बीडी बाबा' नावाच्या तांत्रिकाबाबतही माहिती मिळाली आहे. 


5 आत्मा कोणाच्या..? 
- पोलिसांच्या मते, नोंदींनुसार पाच आत्मांमध्ये ललित (घरातील लहान मुलगा) चे वडील गोपालदास (2007 मध्ये मृत्यू झालेले) यांच्याशिवाय सज्जन सिंह, हिरा, दयानंद आणि गंगा देवी अशा इतर चार आत्माही होत्या. 
- सज्जन हे ललितचे सासरे होते. हिरा, प्रतिभा (ललितची बहीण) चे पती , दयानंद आणि गंगा देवी ललितची दुसरी बहीण सुजाताचे सासू सासरे होते. त्यांचा मृत्यूही गोपालदास यांचा मृत्यू झाला त्या काळातच झाला होता. 
- डायरीतील नोंदींनुसार, ललितच्या वडिलांप्रमाणे या चार आत्माही मोक्षप्राप्तीसाठी भटकत आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य हरिगद्वारला जाऊन त्यांचे धार्मिक विधी करतील तेव्हाच त्यांना मुक्ती मिळेल असे म्हटले गेले होते. हे सर्व 9 जुलै 2015 रोजी लिहिण्यात आले आहे. 
- रिपोर्टनुसार पोलिस आता कुटुंबाच्या संपर्कातील 13 लोकांची पुन्हा विचारपूस करणार आहेत. यात ललितची मोठी बहीण सुजाता आणि भाऊ दिनेशसह घराचे काम करणारा राज मिस्त्री यांचा समावेश आहे. सध्या सुजाता आणि दिनेश दिल्लीच्या बाहेर आहेत. 


अज्ञाताच्या पत्राने उडाली खळबळ 
दरम्यान, एका निनावी पत्राचीही सध्या चर्चा आहे. ते पाठवणाऱ्या व्यक्तीने एका तांत्रिकाचे नाव लिहिले आहे. भाटिया कुटुंबातील सदस्य कराला गावातील या मांत्रिकाकडे जात होते, असे सांगितले जात आहे. तांत्रिकाचे नाव 'बीडी बाबा' असल्याचे पत्रात म्हटले आहे. 


कोण आहे बीडी बाबा?
बीडी बाबा हा दिल्लीच्या कराला परिसरात तांत्रिक चंद्रप्रकाश पाठक 'बीडी वाले बाबा' आणइ 'दाढीवाले बाबा' नावाने प्रसिद्ध आहे. पत्रानुसार हा तांत्रिक स्वतः हनुमान भक्त असल्याचे सांगतो आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत तंत्र मंत्र करत असतो. त्याची पत्नीही तांत्रिक आहे, असे सांगितले जाते. पत्र पाठवणाऱ्याने असा दावाही केला आहे की, भाटिया कुटुंबातील ज्या 11 जणांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी अनेक लोक या बाबाला भेटायला जात होते असा दावाही पत्रात करण्यात आला आहे. पोलिसांनी चौकशी करण्याची विनंती त्याने केली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...