आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुराड़ीः प्रकरणात नवा पेच, मृत्यूच्या एका दिवसाआधी 5 हजारांचे रिचार्ज करायचे होते ललितला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशभरात खळबळ उडवणाऱ्या बुराडीमधील 11 जणांच्या गूढ मृत्यू प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशा या घटनेच्या रहस्यमय बाबी एकेक करून बाहेर पडत आहेत. ही घटना 30 जून (शनिवार) रोजी रात्रीची होती आणि दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 11 जणांचे मृतदेह घरात फासावर लटकलेले आढळले. यामागे भलेही मोक्ष प्राप्तीसाठी केलेली तंत्रसाधना असल्याचे सांगण्यात येत असो, पण या सामूहिक हत्येचा सूत्रधार ललित भाटियाच असल्याचे मानले जात आहे. 11 जणांच्या गूढ मृत्यू प्रकरणात आता आणखी एक नवी बाब समोर आली आहे.


'त्या' दिवशी ललितचा व्यवहार गूढ होता
सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, ललित घटनेच्या दिवशी म्हणजेच 30 जून रोजी सकाळपासूनच खूप अस्वस्थ होता. क्राइम ब्रँचने घरात लागलेले 16 सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर तपासल्यानंतर हे तथ्य समोर आले आहे. या फुटेजमध्ये ललित बेचैन असल्याचे स्पष्ट दिसत आहे.


ललितची बेचैनी सीसीटीव्हीत कैद
पोलिस सूत्रांनुसार, 30 जून रोजी सकाळी साडे दहा वाजता घराच्या ग्राउंड फ्लोअरवर असलेली ललितची प्लायवुडची दुकान उघडलेली होती. दुकान उघडण्याच्या वेळी ललितही तेथे उपस्थित होता. परंतु तो खूप बेचैन दिसत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचीही बेचैनी कैद झाली.
अस्वस्थतेमुळे तो दुकानावर लक्ष देऊ शकत नव्हता. काही मिनिटांच्या अंतराने तो सारख आत-बाहेर करत होता. असेच जवळजवळ साडे 11 वाजेपर्यंत सुरू होते. यादरम्यान ललित गुटखा सारखा पदार्थ चघळताना दिसत आहे.

 

5 हजार रुपयांचे टॉक टाइम रिचार्ज करायचे होते
यानंतर तो साडे 11 वाजता दुकानातून निघाला आणि आपल्या गल्लीतील मुख्य रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या नेहरू गल्लीत मोबाइल दुकानावर रिचार्ज करण्यासाठी गेला. क्राइम ब्रांचने जेव्हा दुकानदाराला विचारले तेव्हा कळले की, ललितने 500 रुपयांचे रिचार्ज केले होते आणि दुकानदाराला म्हणाला होता की, त्याला 4 ते 5 हजार रुपयांचे रिचार्ज करायचे आहे.

 

रजिस्टरमध्ये गूढ मजकूर:
क्राइम ब्रँचला ललितच्या घरातून 5 जून 2013 ते 30 जून 2018 पर्यंत लिहिलेले 11 रजिस्टर आढळले आहेत. यात 4 वेगवेगळे हस्ताक्षरे आहेत. बहुतांश बाबी ललितची भाची प्रियंकाने लिहिल्या आहेत. पोलिस एक्स्पर्टकडून इतर लिखाणही तपास आहेत. क्राइम ब्रँचचे जॉइंट कमिश्नर आलोक कुमार म्हणाले की, रजिस्टर में लिहिलेल्या बाबी मनोविकारतज्ज्ञांनाही दाखवल्या जातील. या कुटुंबाची मनोस्थिती कोणत्या पातळीवर गेली होती, हे पोलिसांना जाणून घ्यायचे आहे.

 

लहान मुलांचे हात बळजबरी बांधण्यात आले
ललित आणि भूपीचा मुलगा ध्रुव तसेच शिवमच्या हातांवर खोल जखमा आढळल्या आहेत. यावरून या दोघांनी या साधनेला विरोध केला असेल, असे पोलिसांचे मानणे आहे. त्यामुळेच त्यांचे हात बळजबरी बांधण्यात आल्याची शक्यता वाटते.

 

70 हून जास्त जणांची होणार चौकशी
क्राइम ब्रँचच्या टीमने गुरुवारी मृत कुटुंबातील 8 नातेवाइकांना नोटीस जारी केली. त्यांना ललितच्या मनोदशेबाबत चौकशी केली जाईल. क्राइम ब्रँचने चौकशीसाठी त्या 60 जणांचीही यादी बनवली आहे, जे व्यवसायानिमित्त नेहमी ललितशी मोबाइलवर संपर्कात राहायचे. शेजाऱ्यांकडूनही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे की, घटनेपूर्वी कुटुंबातील सदस्यांचा व्यवहार नॉर्मल होता की बदलला होता.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, देशाला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणाचे आणखी Photos...

 

बातम्या आणखी आहेत...