आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AirAsia च्या सीईओ आणि डायरेक्टरविरोधात एफआयआर, सीबीआयची तीन शहरात छापेमारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंतरराष्ट्रीय उड्डाणासाठीचे लायसन्स मिळण्यासाठी पाच वर्षांचा अनुभव आणि 20 एअरक्राफ्ट असणे आवश्यक आहे. - Divya Marathi
अंतरराष्ट्रीय उड्डाणासाठीचे लायसन्स मिळण्यासाठी पाच वर्षांचा अनुभव आणि 20 एअरक्राफ्ट असणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत केंद्रीय अन्वेषण विभागाने एअर एशियाचे ग्रुप सीईओ टोनी फर्नांडिस आणि इतर संचालकांविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. 5/20 नियमात सूट मिळण्यासाठी आणि फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डच्या (एफआयपीबी) नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी एअर एशियाच्या डायरेक्टर्स विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये काही सरकारी अधिकारीही सहभागी असण्याची शक्यता आहे. सीबीआयने आरोपींच्या शोधात दिल्ली, मुंबई, बंगळुरुसह 6 ठिकाणी छापेमारी केली आहे.

 

एफआयआरमध्ये यांचीही नावे... 
टोनी फर्नांडिस- ग्रुप सीईओ, एअर एशिया मलेशिया
सुनील कपूर- ट्रॅव्हल फूड 
आर वेंकटरमन- डायरेक्टर, एअर एशिया
दीपक तलवार- एव्हिएशन कंसल्टेंट
राजेंद्र दुबे- डायरेक्टर, एसएनआर ट्रेडिंग, सिंगापुर

 

काय आहे 5/20 नियम 
- एव्हिएशन सेक्टरच्या नियमानुसार, कोणत्याही एअरलाइलनला अंतरराष्ट्रीय उड्डाणासाठीचे लायसन्स मिळण्यासाठी त्यांच्याकडे पाच वर्षांचा अनुभव आणि 20 एअरक्राफ्ट असणे आवश्यक आहे. 

 

सरकारी अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी करुन नियमांत सूट मिळवली 
- टोनी फर्नांडिसवर आरोप आहे की त्याने 5/20 निमय आणि रेग्युलेटरी पॉलिसीजमध्ये बदल करण्यासाठी आणि इतरही परवाने मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी केली आहे. 

 

आरोपींचा शोध सुरु 

- तपास संस्थेने आरोपींच्या शोधात दिल्ली, मुंबई आणि बंगळुरुमध्ये 6 ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...