आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदी- माल्याला परत आणण्यावर किती खर्च, RTI ला उत्तर देण्यास CBI चा नकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजय माल्या 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून पळून गेला आहे. - Divya Marathi
विजय माल्या 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून पळून गेला आहे.

नवी दिल्ली - देशातील बँकांमधून कोट्यवधीचे कर्ज घेऊन विदेशात पळून जाण्याचे चलन वाढले आहे. सध्याचे ताजे प्रकरण हिरे व्यापारी नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला 11,400 कोटींचा चुना लावला आहे. नुकतेच त्याचे पत्र समोर आले आहे, त्यात त्याने आता कर्ज परतफेड विसरा असे म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतातून पळून गेलेल्या ललित मोदी आणि विजय माल्या यांना भारतात परत आणण्याच्या प्रक्रियेवर किती रुपये खर्च झाले, असा सवाल सीबीआयला करण्यात आला आहे. माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचे उत्तर देण्याचे सीबीआयने टाळले आहे. विजय माल्या 2 मार्च 2016 रोजी लंडनला पळून गेला होता. त्यानंतर त्याला फरार घोषित करण्यात आले होते. ललित मोदीवर मनी लाँड्रिंगची केस आहे. 

 

कोणी विचारली माहिती 
- पुण्यातील RTI अॅक्टिव्हिस्ट विहार धुर्वे यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) विचारणा केली आहे की मोदी आणि माल्या यांना भारतात आणण्यासाठी आतापर्यंत किती पैसा खर्च झाला. 
- सीबीआयने म्हटले, 2011च्या सरकारी नोटिफिकेशननुसार आरटीआयमध्ये अशा प्रकरणांची माहिती दिली जात नाही. 

 

अर्थ मंत्रालयाने CBI ला पाठवला होता अर्ज 
- प्रत्यार्पण प्रकरणी सीबीआयची टीम अनेकदा लंडनला जाऊन आली आहे. 
- अर्थमंत्रालयाला मिळालेला आरटीआय अर्ज त्यांनी सीबीआयकडे पाठवला होता. सीबीआयने या प्रकरणी तपास करणाऱ्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (एसआयटी) कडे हा अर्ज पाठवला. 

 

सीबीआय म्हणाले- कायद्यातून सूट 
- सीबीआयने आपल्या उत्तरात म्हटले आहे, की 2011  च्या एका सरकारी नोटिफिकेशननुसार आरटीआय अंतर्गत विचारण्यात आलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देण्याची सूट मिळालेली आहे.
- या कायद्याच्या सेक्शन 24 नुसार काही शासकीय यंत्रणांना आरटीआय कायद्यात सुट मिळालेली आहे. 
- वास्तविक दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट केले आहे की प्रकरण जर भ्रष्टाचार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन यासंबंधी असेल तर सेक्शन 24 नुसार यंत्रणांना त्यातून सुट मिळाल्याचा दावा करता येऊ शकत नाही. 

 

माल्या व ललित मोदीवर काय आरोप ?
- विजय माल्याने भारतीय बँकांचे जवळपास 9 हजार कोटी रुपये कर्ज बुडवले आहे. 
- ललित मोदीवर भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. 

 

राहुल गांधींनी केले होते ट्विट.. 
- विजय माल्या आणि ललित मोदी हे देश सोडून पळून गेले आहेत. त्यांना भारतात आणण्यात यंत्रणांना अजून यश आलेले नाही. 
- असे असताना हिरे व्यापारी नीरव मोदीने पीएनबीला 11,400 कोटींचा चुना लावला आहे. माल्या आणि ललित मोदीच्या पावलावर पाऊल ठेवत नीरव मोदीही देशातून पसार झाला आहे. 
- रविवारी यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. 
- ते म्हणाले, 'आधी ललित मोदी नंतर विजय माल्या पसार झाला. न खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणारे देशाचे चौकीदार? साहेबांच्या मौनाचे कारण जाणून घेण्यासाधी देशाची जनता अतूर आहे. मात्र त्यांची चुप्पी ते कोणाचे वफादार आहे हे ओरडून ओरडून सांगत आहे.'

बातम्या आणखी आहेत...