आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Center Extends Deadline For Linking Of Aadhar To Bank Account Big News And Updates

बँक अकाउंटला आधार-पॅन लिंक करण्याची 31 डिसेंबरची डेडलाइन मागे, लवकरच नवी तारीख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकारने बँक अकाउंट उघडण्यासहित तमाम आर्थिक सेवांसाठी आधार आणि पॅन लिंक करण्याची डेडलाइन मागे घेतली आहे. आधी ही डेडलाइन 31 डिसेंबर होती. केंद्र सरकारने मंगळवारी गॅजेट नोटिफिकेशन जारी करून डेडलाइन मागे घेतली आहे. नवी डेडलाइन नंतर जारी केली जाईल.

 

मनी लाँड्रिंग अॅक्टअंतर्गत नियमात बदल
> गॅजेट नोटिफिकेशनच्या माध्यमातून प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट (PMLA) 2002चे नवे नियम अधिसूचित करण्यात आले आहेत. यानुसार, आधार नंबर, पॅन किंवा फॉर्म 60 केंद्र सरकारद्वारे निश्चित करण्यात आलेल्या तारखेपर्यंत सबमिट केले पाहिजेत. याआधीच्या नियमात म्हटले होते की, आधार नंबर आणि पॅन 31 डिसेंबर 2017 पर्यंत सबमिट करावे लागेल.
> मंगळवारी गॅजेट नोटिफिकेशनमधून अर्थ मंत्रालयाने बँक अकाउंट उघडण्यासहित सर्व आर्थिक सेवांसाठी आधार नोंदणी करण्याची मर्यादा वाढवण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
> केंद्राने मागच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात सांगितले होते की, विविध सेवा आणि योजनांसाठी आधार लिंक करण्याची मर्यादा वाढवून 31 मार्च करण्यासाठी तयार आहोत. 7 डिसेंबर रोजी केंद्राने पॅनला आधार लिंक करण्याची मर्यादा वाढवून 31 मार्च 2018 केली आहे.

> पीएमएलए अंतर्गत बँका आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्ससाठी बँक अकाउंट उघडणे वा 50 हजार वा त्याहून जास्तीच्या व्यवहारासाठी आधार आणि पॅन असणे अनिवार्य आहे. मंगळवारी जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, जर सरकारद्वारे ठरवण्यात आलेल्या तारखेपर्यंत अकाउंट होल्डरने पॅन आणि आधार लिंक केले नाही तर अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन बंद होईल.

 

या सर्व्हिसेससाठी आधार-पॅन लिंकिंग गरजेचे
> बँक अकाउंट, पोस्ट ऑफिस अकाउंट, म्युच्युअल फंड अकाउंट, डिमॅट अकाउंट, विमा पॉलिसीला आधार आणि पॅन लिंक करणे आवश्यक आहे. आता या सेवांसाठी आधार आणि पॅन लिंक करण्याची नवी तारीख जाहीर केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...