आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कावेरी जल वाद मिटवण्यासाठी केंद्र लवकरच योजना आणणार, 3 मेपर्यंतचा कालावधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सरकार कावेरी पाणी वाटप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणीसाठी लवकरच एक योजना तयार करणार आहे, असे पाणी व गंगा विकास राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी स्पष्ट केले आहे.  


गेल्या आठवड्यात संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप झाला. त्या पार्श्वभूमीवर मेघवाल यांनी ही माहिती दिली. या मुद्द्यावर अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळाची मागणी लावून धरली. दररोज संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ केला. त्यामुळे संसदेचे कामकाज चालू शकले नाही. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ व पुदुच्चेरीदरम्यान पाणी वाटपाच्या प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार योजना तयार करण्याचे ठरवले. हा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सरकार त्यास सादर करणार आहे.

 

मेघवाल म्हणाले, पाणी वाटपाशी संबंधित राज्यांच्या मुख्य सचिव व पाणी व्यवस्थापन सचिवांशी चर्चा झाली आहे. न्यायालयात मांडण्यात येणाऱ्या प्रस्तावाबद्दल या राज्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. मंडळाच्या सदस्यांच्या निवडीबद्दल राज्यांशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.  

 

३ मेपर्यंतचा कालावधी  
सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न सोडवण्यासाठी मंडळ स्थापन केल्यास या प्रश्नाची सोडवणूक होईल, असे म्हटले आहे. अशा प्रकारची योजना तयार करण्यासाठी न्यायालयाने सरकारला तीन मेपर्यंतचा कालावधी दिला आहे. १६ फेब्रुवारी रोजी कावेरी प्रकरणात न्यायालयाने निवाडा दिला होता. त्याचबराेबर सहा आठवड्यांत मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले होते.

 

विसर्ग रोखल्याचा केंद्राला संशय
कावेरी व्यवस्थापन मंडळाची स्थापना झाली नसल्यामुळे तमिळनाडूला सिंचनासाठीचे पाणी देण्यात अाले नाही, असे केंद्राला वाटते. वास्तविक सिंचनासाठी जून ते जानेवारी दरम्यान सिंचनाला पाणी मिळणे अपेक्षित आहे. फेब्रुवारी व मे दरम्यान पाण्याचा विसर्ग करण्याची गरज नाही, असे लवादाने स्पष्ट केले होते.

 

दोन्ही राज्यांसाठी संवेदनशील
केंद्र सरकारने या प्रकरणात योजना तयार करण्यासाठी मुदत वाढवून मागण्यात आली आहे. कर्नाटकात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. कावेरीचा प्रश्न कर्नाटक व तमिळनाडू या दोन्ही राज्यांसाठी महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. निवडणुकीदरम्यान काही अनुचित घडू नये किंवा त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ नये म्हणून मदत मागण्यात आली आहे, असे मेघवाल यांनी सांगितले.


आजच्या बंदला काँग्रेसचा पाठिंबा : पुद्देचेरीत कावेरी व्यवस्थापन मंडळाची स्थापना करण्यात केंद्राला अपयश आल्याच्या निषेधार्थ पीएमके अर्थात पत्ताली मक्कल कटचीने बुधवारी पुकारलेल्या बंदला प्रदेश काँग्रेसने आपला पाठिंबा दर्शवला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...