रमजान दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये / रमजान दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन नाही, दहशतवादी हल्ले झाल्यास कारवाई- केंद्र सरकार

दिव्य मराठी वेब टीम

May 16,2018 06:34:00 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने रमजान दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन न करण्याचे निर्देश सुरक्षाबलांना दिले आहे. गृहमंत्रालयाने ट्विट करुन म्हटले आहे, की शांतीप्रीय मुस्लिमांना शांततापूर्ण वातावरण देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासोबतच ट्विटमध्ये हेही स्पष्ट करण्यात आले आहे की दहशतवादी हल्ला झाला किंवा लहान मुलांना वाचवण्यासाठी सुरक्षारक्षक हे प्रत्युत्तरादाखल कारवाई करु शकतात. या निर्णयाची माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांना दिली आहे.

इस्लामचे नाव खराब करणाऱ्यांना वेगळे करण्याची गरज
- गृहमंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे, की दहशत आणि भीती पसरवून इस्लामचे नाव खराब करणाऱ्यांना वेगळे केले पाहिजे. सरकारला या अभियानात सर्वांचे सहकार्य अपेक्षीत आहे. यात मुस्लिम बंधू-भगिनींची मदत अपेक्षीत आहे. जेणे करुन शांतातमय वातावरणात रमजान साजरा होऊ शकेल.

महबूबांनी केली होती रमजान दरम्यान युद्धविरामाची मागणी
- गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरमध्ये सर्व पक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी रमजान आणि अमरनाथ यात्रेदरम्यान युद्धविरामाची मागणी केंद्र सरकारकडे केली होती.
यावर केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या की भारतीय सेना जम्मू-काश्मीरसह देशभरात शांतता आणि एकतेला धोका निर्माण करणाऱ्या दहशतवादाचा जोरकसपणे समाना केला जाईल आणि त्याला नष्ट करण्यासाठी योग्य पाऊले उचलेल जातील.

X
COMMENT