आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जज लोया यांच्या मृत्यू प्रकरणाचा खटला, सरन्यायाधीश मिश्रांच्या बेंचकडे, 22 जानेवारीला सुनावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बीएच लोया यांच्या मृत्यू प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी आता सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या पीठासमोर होणआर आहे. आधी जस्टिस अरुण मिश्रा यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू होती. काही दिवसांपूर्वी जस्टीस अरुण मिश्रांनी या प्रकरणातून अंग काढून घेतले होते. जज लोया 1 डिसेंबर 2014 ला नागपूरमध्ये त्यांच्या सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी जात होते, त्याचवेळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला होता. 


- न्यूज एजन्सी एएनआयने सुप्रीम कोर्ट कॉजलिस्टच्या हवाल्याने सांगितले आहे की, जज लोयांच्या प्रकरणाची सुनावणी जस्टीस दीपक मिश्रांच्या पीठासमोर होणार आहे. चीफ जस्टीस 22 जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी करणार आहेत. 
- या पीठात सरन्यायाधीशांसह ए.एम.खानविलकर आणि जस्टीस डी.वाय.चंद्रचूड यांचा समावेश आहे. 

 

जस्टीस मिश्रांनी का काढून घेतले अंग 
सुप्रीम कोर्टाचे जस्टिस जे चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन बी लोकुर आणि कुरियन जोसेफ यांनी 12 जानेवारीला एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात महत्त्वाच्या खटल्यांच्या वाटपाबाबत सरन्यायाधीशांच्या निर्णयावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले होते. त्यावेळी जज लोया यांच्या मृत्यू प्रकरणाचा उल्लेखही झाला होता. त्यामुळे मिश्रा यांनी या प्रकरणातून माघार घेतली.

 

बातम्या आणखी आहेत...