आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; पुन्हा समन्स पाठवल्याबद्दल प्रश्नचिन्ह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना विधानसभा समितीच्या समोर उपस्थित राहण्यापासून दिलासा दिला आहे. प्रश्न आणि संदर्भ समितीने ११ एप्रिलपर्यंत अंशू प्रकाश यांना हजर राहण्याचे आदेश देऊ नयेत, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.


आधीच्या आदेशानंतरही मुख्य सचिवांना पुन्हा नोटीस जारी केल्याबद्दल न्यायमूर्ती राजीव शकधर यांनी समितीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समितीने बुधवारी नोटीस जारी करून मुख्य सचिवांना गुरुवारी ३ वाजता हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात मुख्य सचिवांनी बुधवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली तेव्हा मुख्य सचिवांच्या वकिलाने म्हटले की, नोटीस जारी करून माझ्या अशिलाला धमकी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे समितीने म्हटले की, मुख्य सचिवांना हजर राहण्यास सांगणार नाही. याआधी पाच मार्चला विधानसभा समितीने उच्च न्यायालयाला सांगितले होते की, मुख्य सचिवांच्या विरोधात बदल्याच्या भावनेने कारवाई केली जाणार नाही.


नवी दिल्ली : ‘आप’च्या आमदारांच्याकोठडीत १४ दिवस वाढ
तीस हजारी न्यायालयाने दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांच्याशी कथित गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात अटक झालेल्या आम आदमी पक्षाच्या (आप) दोन आमदारांच्या न्यायिक कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ केली आहे.


ओखलाचे आमदार अमानतुल्ला खान आणि देवलीचे आमदार प्रकाश जारवाल हे दोघे या प्रकरणात १४ दिवस न्यायालयीन कोठडीत होते. कोठडीची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांना महानगर दंडाधिकारी शेफाली बर्नाला टंडन यांच्यासमोर हजर करण्यात आले. शेफाली यांनी दोघांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ केली आहे. हे दोघे आता २२ मार्चपर्यंत कोठडीत राहतील.अंशू प्रकाश यांच्याशी १९ फेब्रुवारीच्या रात्री मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी कथित गैरवर्तन करण्यात आले होते. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता.

बातम्या आणखी आहेत...