आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकुनगुन्याचे रुग्ण 230%, तर डेंग्यूचे रुग्ण 107% वाढले;5 वर्षांत दाेन हजार काेटी रुपये खर्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- डेंग्यू व चिकुनगुन्यासारख्या गंभीर अाजारांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने गत ५ वर्षांत दाेन हजार काेटी रुपये खर्च केले अाहेत; परंतु तरीही या अाजारांचे प्रमाण कमी हाेण्याएेवजी वेगाने वाढले अाहे. या पाच वर्षांत डेंग्यूची १०७ % प्रकरणे समाेर अाली अाहेत व या अाजाराने मरण पावणाऱ्यांच्या संख्येतही ८२ % वाढ झाली अाहे. तसेच चिकुनगुन्या झालेल्या रुग्णांचे प्रमाण २३० % पर्यंत वाढले अाहे.


माेठ्या प्रमाणावरील प्रचार, अभियान व प्रयत्नांनंतरही हे अाजार नियंत्रणात का येत नाहीत? असे ‘दिव्य मराठी’ने देशातील सर्वाेच्च सरकारी संस्था व डाॅक्टरांना विचारले असता, विविध बाबी समाेर अाल्या. गत काही वर्षांत बांधकामांचे प्रमाण खूप वाढले अाहे. हे डासांमुळे हाेणाऱ्या अाजारांचे सर्वात माेठे कारण असून, बांधकामे हाेणाऱ्या स्थळांवर डासांची पैदास माेठ्या प्रमाणावर हाेत अाहे. तसेच पूर्वीच्या तुलनेत सर्व्हिलन्सही वाढले असल्याने डेंग्यूच्या प्रकरणांची सातत्याने नाेंद हाेत अाहे, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे याबाबतच्या सरकारी अभियानांमध्येच अनेक त्रुटी असल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे अाहे.


राष्ट्रीय व्हेक्टरजनित राेग नियंत्रण कार्यक्रमाचे सल्लागार डाॅ.ए.सी.धारीवाल यांनी  सांगितले की, देशात डेंग्यू, चिकुनगुन्यावर ना काेणते अाैषध अाहे ना कुठलीही लस. 

 

या अाजारांची चिकित्सा करण्यास हाेणाऱ्या विलंबामुळे उपचारावर काेणताही प्रभाव पडत 
नाही. कारण या अाजारांत तापावर नियंत्रण मिळवण्याची व शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राखण्याचीच अाैषधे दिली जातात. एखाद्या रुग्णाला डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुन्या असे तिन्ही अाजार झाल्याचे प्रकरण दुर्मिळच असते. अशा स्थितीत ताप नियंत्रणात अाणण्यासाठी डेंग्यू-चिकुनगुन्याच्या रुग्णांना पॅरासिटाॅमाॅलच दिली जाते, तर मलेरियाच्या तपासणीनंतर व त्यासाठी अाैषधे उपलब्ध अाहेत.


फ्रान्सची कंपनी सनाेफीने डेंग्यूपासून बचावासाठी लस उपलब्ध करून दिली अाहे; परंतु भारत सरकारने ही लस वापरण्यास परवानगी दिलेली नाही. क्लिनिकल ट्रायलशिवाय या लसीला भारतात परवानगी मिळावी, अशी कंपनीची इच्छा अाहे, तर ज्या देशांतील बाजारात ही लस उपलब्ध करून देण्यात अालीय, तेथेही तिचे सकारात्मक परिणाम समाेर अाले नसल्याचे भारत सरकारचे म्हणणे अाहे. 

 

या अाजारांबाबत माहिती देताना राष्ट्रीय मलेरिया संस्थेच्या निदेशक डाॅ.नीना वालेचा यांनी सांगितले की, मैदानी भागांत मलेरिया झालेल्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले अाहे; परंतु हिमालयीन राज्यांत अाता मलेरियाची प्रकरणे समाेर येऊ लागली अाहेत. जलवायू परिवर्तनामुळे ही स्थिती उद्भवली अाहे. तसेच संपूर्ण जगात मलेरियापासून बचावासाठी अजूनही कुठली व्यावसायिक लस उपलब्ध झालेली नाही. 

 

सरकारी प्रयत्नांत या त्रुटी : डाॅक्टर

१. दिल्ली मेडिकल काैन्सिलच्या अँटिक्वेकरी सेलचे माजी अध्यक्ष डाॅ. अनिल बन्सल यांनी सांगितले की, डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुन्यापासून बचावासाठी सरकार हंगामी अभियान राबवते; परंतु हे चुकीचे अाहे. या माेहिमा सातत्याने राबवल्या गेल्या पाहिजेत. कारण देशात एडिस डासांच्या निर्मितीचा धाेका नेहमीच असताे.
२. एडिस डास दिवसाच चावत असल्याचे सरकारी संस्थांकडून सांगण्यात अाले; परंतु हे चुकीचे अाहे. प्रकाश असेल तेथे हे डास मनुष्याला लक्ष्य बनवतात; मग दिवस असाे की, रात्र. त्यामुळे या अभियानातून देशात चुकीचा संदेश गेला अाहे, असे सर गंगाराम रुग्णालयाचे वरिष्ठ सल्लागार डाॅ. अतुन गाेगिया यांनी स्पष्ट केले.
३. आयएमएचे माजी अध्यक्ष डाॅ.के.के. अग्रवाल यांनी सांगितले की, डेंग्यू हाेण्याच्या काळात चिकित्सा करून या वेळी डेंग्यूचा काेणता प्रकार सक्रिय अाहे, हे सांगण्याचे काेणतेही धाेरण सरकारने बनवलेले नाही. परिणामी, गरज नसलेल्या रुग्णांनाही दाखल केले जाते.

 

तपासणी वाढल्याने प्रकरणांत वाढ : सरकार

१. या अाजारांची तपासणी वाढली अाहे. त्यामुळे रुग्णांची संख्यादेखील वाढली, असे देशात पाण्यामुळे हाेणाऱ्या अाजारांची चिकित्सा व उपचार करणारी भारत सरकारची सर्वात माेठी संस्था राष्ट्रीय व्हेक्टरजनित राेग नियंत्रण कार्यक्रमाचे प्रमुख डाॅ.ए.सी. धारीवाल यांनी सांगितले.

२. देशभरात बांधकामे वाढत अाहेत. परिणामी, व्हेक्टर बाॅर्न डिसीज रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत अाहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, महाराष्ट्रातील स्थिती अशी...

बातम्या आणखी आहेत...