आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनऊ - येथील प्रसिद्ध शाळा ब्राइटलँडमध्ये 7 वर्षांचा मुलगा जखमी आवस्थेत सापडला. मुलाच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर त्याला शाळेच्या बाथरुममध्ये बंद करण्यात आले होते. मुलाच्या वर्गापासून बाथरून 200 मीटर अंतरावर आहे. शाळेच्या सामुहिक प्रार्थनेवेळी डिसिप्लिन हेड मुलांना बोलावण्यासाठी प्रत्येक वर्गात जात असताना बाथरुममधून ओरडण्याचा आवाज येत होता. दार उघडल्यानंतर रक्ताने माखलेला एक मुलगा दिसला. त्याच्या तोंडात लाल रंगाचा कपडा कोंबलेला होता, असे डिसिप्लन हेड अमित सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले, जखमी अवस्थेतील मुलाला किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी जखमी मुलांच्या पालकांची भेट घेऊन चौकशी सुरु केली आहे.
पालकांनी गेला खळबळजनक आरोप- मुलीने हातपाय बांधून चाकूने केले वार
- जखमी मुलाचे पालक राजेश सिंह यांचा आरोप आहे की पहिलीच्या वर्गातील त्यांचा मुलगा ऋतिक याच्यासोबत एवढी मोठी घटना झाल्यानंतरही ब्राइटलँड शाळा प्रशासनाने पोलिसांना घटनेची माहिती दिली नाही. माध्यमांमध्ये या घटनेबद्दल चर्चा सुरु झाल्यानंतर शाळेने पोलिसांना कळवले. राजेश सिंह हे हायकोर्टात जॉब करतात.
- राजेश सिंह म्हणाले, 'मंगळवारी मुलाला शाळेत सोडल्यानंतर मी कोर्टात गेलो होतो. थोड्या वेळात फोन आला की मुलाला लागले आहे, पत्नीला घेऊन लवकर शाळेत या. तिथे गेल्यानंतर कळाले की माझ्या 7 वर्षांच्या मुलावर चाकू हल्ला झाला आहे.'
- राजेश सिंह यांनी आरोप केला आहे, की शाळेतील एका मुलीने त्यांच्या मुलाचे हातपाय बांधून त्याला बाथरुममध्ये बंद केले आणि त्याच्यावर चाकूने वार केला. मुलीने असे का केले, हे मात्र ते सांगू शकलेले नाही.
मुलाचा मोठा भाऊ 6 महिन्यापासून शाळेत नाही
- ऋतिकचे वडील राजेश सिंह म्हणाले, माझा मोठा मुलगा याच शाळेत 6वीमध्ये आहे. तो सहा महिन्यांपासून शाळेत जात नाही. तो फक्त एवढेच सांगतो की शाळेत जाणार नाही.
पोलिस काय म्हणाले ?
- पोलिस आयुक्त हरेंद्रकुमार म्हणाले, 'घटना मंगळवारची असून शाळा प्रशासनाने बुधवारी आम्हाला त्याबद्दल सांगितले आहे. पोलिस जखमी मुलाच्या पालकांना भेटले असून या प्रकरणाचा आम्ही गांभीर्याने तपास करत आहोत. शाळा प्रशासनाने वेळेवर माहिती देणे गरजेचे होते.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.