आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेता राजपाल यादवला 6 वर्षांचा तुरुंगवास, चेक बाऊन्सप्रकरणी कोर्टाने सुनावली शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हंगामा, भूलभुलैय्या, पार्टनर अशा चित्रपटांतून झळकलेला विनोदी अभिनेता राजपाल यादव याला कोर्टाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीच्या कडकडडुमा कोर्टाने सोमवारी एका धनादेश न वठल्याच्या प्रकरणी सुनावणी देताना ही शिक्षा सुनावली. गेल्या शुक्रवारी राजपाल यादव, त्यांची पत्नी आणि एका कंपनीला एका कर्ज प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. त्या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली होती. 


2010 मध्ये राजपाल आणि राधा यादव यांनी दिल्लीतील एम.जी.अग्रवाल या व्यावसायिकाकडून त्यांच्या अता पता लापता या चित्रपटासाठी कर्ज घेतले होते. राजपाल यादव यांचा हा दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न होता. पण पैसे परत न करू शकल्यामुळे अग्रवाल यांनी राजपाल आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात पोलिस तक्रार केली होती. 2013 मध्ये यादव यांना या प्रकरणी 10 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीलाही सामोरे जावे लागले होते. त्यावेळी कोर्टाने या दोघांच्या संपत्तीची जप्ती आणि बँक अकाऊंट सील करण्याचे आदेशही दिले होते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...