आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 राज्यात विरोधीपक्षांची सरकार स्थापन करण्याची मागणी: गोव्यात काँग्रेस, बिहारमध्ये तेजस्वी राज्यपालांना भेटले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष (104) ठरल्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आणि गुरुवारी सकाळी त्यांचा शपथविधीही उरकण्यात आला. त्यानंतर देशातील राजकारण तापले आहे. आता काँग्रेसने गोवा, मणिपूर, मेघालय आणि राष्ट्रीय जनता दलाने (राजद) बिहार, एनपीएफने नागालँडमध्ये सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी अशी मागणी केली आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी काँग्रेस आणि सीपीआयच्या आमदारांसह राज्यपालांना पत्रही दिले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, राज्यात सर्वात मोठा पक्ष या नात्याने आम्हाला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण मिळाले पाहिजे. या पाचही राज्यांमध्ये विरोधकांची संख्या सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त आहे. मात्र सरकार भाजप किंवा एनडीएचे आहे. शुक्रवारी गोव्यात काँग्रेसच्या 13 आमदारांनी राज्यपाल मृदुला सिन्हांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला. तर, बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या नेतृत्वात राजदजे 80 आमदार राज्यपालांच्या भेटीला गेले.  काँग्रेस आणि राजदचे म्हणणे आहे की कर्नाटकचाच न्याय आम्हालाही लावावा आणि राज्यपालांनी सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण द्यावे. राजद नेते तेजस्वी यादव यांनी तर बिहार सरकार बर्खास्त करण्याची मागणी केली आहे. 

 

कर्नाटकच्या न्यायाने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी 

 

बिहारमध्ये राजद 80 जागांसह सर्वात मोठा पक्ष 
- राजद नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे, की कर्नाटकमध्ये लोकशाही हत्या झाली आहे. त्याविरोधात शुक्रवारी आम्ही धरणे देणार आहोत. बिहार सरकार बर्खास्त करण्याचीही मागणी राज्यपालांकडे केली जाणार आहे. कर्नाटक प्रमाणेच आम्हालाही सरकार स्थापन करण्याची संधी दिली पाहिजे. त्यासाठी राज्यपालांची भेट घेणार आहोत. 
- बिहार निवडणुकीत राजद, जदयू आणि काँग्रेस यांची महाआघाडी होती. या आघाडीला 178 जागा होत्या. 80 जागांसह राजद सर्वात मोठा पक्ष ठरला होता. जदयूला 71 जागा होत्या. त्यांचे नेते नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. तर कांग्रेसला 27 जागा मिळाल्या होत्या. 
- बिहारमध्ये नितीशकुमार यांनी 26 जुलै 2017 रोजी तेजस्वी यादव यांना राजीनामा देण्यास सांगितला. त्यांनी नकार दिल्यानंतर नितीश यांनी स्वतः राजीनामा दिला आणि त्यानंतर भाजप-जदयू युती करत सरकार स्थापन केले होते. 

 

गोवा 

- गोव्यातील काँग्रेस नेते यतीश नाइक म्हणाले, '2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या. आम्ही सर्वात मोठा पक्ष होतो. तरीही राज्यपालांनी 13 जागा असलेल्या भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावले. कर्नाटकात मात्र राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला निमंत्रण दिले. त्यामुळे आमची मागणी आहे की गोव्यातही राज्यपालांनी काँग्रेसला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण द्यावे.'
 

मणिपूर 
- काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री इबोबी सिंह यांनी राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेतली आणि शनिवारी सायंकाळी 4 पर्यंत वाट पाहा. कर्नाटकात बहुमत चाचणीत काय होते ते पाहू. माजी मुख्यमंत्री म्हणाले राज्यापालांनी तुमच्या प्रस्तावावार विचार करु असे सांगितले आहे. आम्हाला विश्वास आहे की न्याय होईल. 

 

मेघालय आणि नागालँड 
- दोन्ही राज्यांचे माजी मुख्यमंत्री शुक्रवारी राज्यपालांना भेटले. मेघालयात काँग्रेस आणि नागालँडमध्ये एनपीएफ सर्वात मोठा पक्ष आहे. दोन्ही राज्यात एनडीएचे सरकार आहे. 

बातम्या आणखी आहेत...