आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मुख्यालयातूनही बेदखल होणार काँग्रेस! केंद्र सरकार लुटियन्स झोनमधील बंगले करणार रिकामे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकारने दिल्लीतील पॉश लुटियन्स झोनमधील काँग्रेसला दिलेल्या चार पैकी तीन बंगले तत्काळ रिकामे करण्याच्या हलचाली सुरु केल्या आहेत. एवढेच नाही तर काँग्रेसचे मुख्यालय असलेले 24, अकबर रोड देखील रिकामे करण्याची केंद्र सरकारची तयारी आहे. सरकारने 24, अकबर रोड हा बंगला रिकामा करण्यासाठी ऑक्टोबर 2017 पर्यंतची मुदत दिली होती. मात्र काँग्रेसने अद्याप हा बंगला सोडलेला नाही.  

 

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, शहर विकास मंत्रालयाने कॅबिनेट कमिटी ऑन ऑकोमोडेशनसमोर एक प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार, लुटियन्स झोन येथील तीन बंगले काँग्रेसला तत्काळ रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये सेवादलाचे कार्यलय, 26 अकबर रोड आणि युवक काँग्रेसचे कार्यालय, सी-2/109 चाणक्यपुरी बंगला यांचा समावेश आहे. समितीला दिलेल्या नोटमध्ये म्हटले आहे की काँग्रेसला 24 अकबर रोड बंगला रिकामा करण्यासाठी ऑक्टोबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. हा बंगला 1976 पासून काँग्रेसचे मुख्यालय म्हणून ओळखला जातो. 

 

तीन वर्षांपूर्वी काँग्रेसला नोटीस 
- शहर विकास मंत्रालयांतर्गत येणाऱ्या डायरेक्टोरेट ऑफ इस्टेट्स यांनी तीन वर्षांपूर्वी काँग्रेसला नोटीस बजावून चार बंगल्याचे वितरण रद्द केले होते. 
- नियमानुसार जर एखाद्या पक्षाला वितरीत करण्यात आलेल्या बंगल्याचे वितरण रद्द करण्यात आले तर त्यांना तीन वर्षात कार्यालय सोडावे लागते, अर्थात बंगला रिकामा करावा लागतो. 
- काँग्रेसला जून 2010 मध्ये नवे कार्यालय तयार करण्यासाठी दिल्लीतील 9-ए राऊज अव्हेन्यू येथे भूखंड देण्यात आला होता. मात्र आता काँग्रेसला मुदतवाढ हवी आहे. कारण 9-ए राऊज अव्हेन्यू येथील बिल्डिंग प्लॅनला अद्याप मंजूरी मिळालेली नाही. आता काँग्रेसन ऑक्टोबर 2018 पर्यंतची मुदतवाढ मागितली आहे. 
- सूत्रांची माहिती आहे की काँग्रेसचे मुख्यालय असलेला 24, अकबर रोड या बंगल्याला ऑक्टोबर 2018 पर्यंत मुदतवाढ दिली जाऊ शकते, मात्र इतर तीन बंगले त्यांना तत्काळ सोडावे लागतील.

बातम्या आणखी आहेत...