आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक आयोग भाजपच्या कठपुतळीसारखे काम करत आहे: राहुल गांधींच्या इंटरव्ह्यू वादावर काँग्रेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राहुल गांधींना निवडणूक आयोगाच्या नोटीसनंतर काँग्रेसने त्यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले- निवडणूक आयोग नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांविरुद्ध कोड ऑफ कंडक्ट (निवडणूक आचारसंहिता) तोडल्यावर कोणतीही कारवाई करत नाही. ते म्हणाले की, असे वाटते की निवडणूक आयोग कठपुतळीप्रमाणे काम करत आहे. बुधवारी भाजपने राहुल यांच्या एका टीव्ही इंटरव्ह्यूची तक्रार दिली होती. यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावून उत्तर मागितले होते.

 

निवडणूक आयोगाच्या डोळ्यावर पट्टी आहे का?
- सुरजेवाला म्हणाले, "नरेंद्र मोदी आपल्या बुडणाऱ्या नौकेसाठी निवडणूक आयोगाचा आधार घेत आहे. 9 डिसेंबर रोजी मोदींनी भाजपला मत देण्याचे आवाहन केले. अमित शहा मतदानाच्या एक दिवसआधी पत्रकार परिषद घेतात. मोदींनी फिक्कीच्या कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करतात."
- मग निवडणूक आयोगाला राहुल गांधींविरुद्ध आचारसंहिता भंगाची तपासणी करण्याचे कारण काय आहे? मोदी वा भाजप नेत्यांवर कोणतीही कारवाई का करत नाही? त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे का? निवडणूक आयोग कठपुतळीसारखे काम करत आहे. 

 

निवडणूक आयोगाने 18 डिसेंबरपर्यंत राहुल यांना मागितले उत्तर
- बुधवारी गुजरातेत दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाआधी राहुल गांधींच्या टीव्ही मुलाखतीवर वाद उभा राहिला. भाजपने राहुल यांच्यावर आचारसंहिता उल्लंघनाचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. निवडणूक आयोगाने राहुल यांना नोटीस जारी करून विचारले- स्पष्ट करा की आचारसंहिता तोडल्यामुळे तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये?
- राहुल यांना 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर देण्यासाठी सांगण्यात आले आहे. राहुल यांच्या बचावात युक्तिवादासाठी काँग्रेस नेते बुधवारी रात्री 9 वाजता निवडणूक आयोगात पोहोचले होते.

 

चॅनल्सविरुद्ध एफआयआरचा आदेश
- तथापि, राहुल यांची मुलाखत बुधवारी दुपारी 1 वाजता तीन स्थानिक वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाली. यात त्यांनी मोदी आणि भाजपला टीका केली. सोबतच काँग्रेसच्या एकतर्फी विजयाचे दावे केले. भाजपच्या तक्रारीनंतर काँग्रेसनेही पलटवार केला. संध्याकाळी 7.30 वाजता निवडणूक आयोगाने वाहिन्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...