आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत शरद पवार Congress Releases List Of Star Campaigner For Karnataka Election 2018

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्नाटक इलेक्शन: काँग्रेसने जारी केली स्टार प्रचारकांची लिस्ट; शरद पवार-अखिलेश यांचीही नावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणूक यावेळी रंगतदार होणार आहे. कारण या निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारकांच्या फौजेसमोर काँग्रेसने 2 पाऊल पुढे जाऊन आपल्या सहकारी पक्षांच्या स्टार नेत्यांना सहभागी केले आहे. काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी आपल्या स्टार प्रचारकांची लिस्ट जाहीर केली. 

 

>या लिस्टमध्ये काँग्रेसच्या 22 नेत्यांना जागा देण्यात आली आहे. यात ज्येष्ठ काँग्रेसी नेते गुलाम नबी आझाद, सुशीलकुमार शिंदे, सचिन पायलट, सिद्धू, ज्योतिरादित्य सिंधिया, अशोक गहलोत यांसारखे नेते आहेत. पण खास बाब म्हणजे कर्नाटकाचे रण जिंकण्यासाठी काँग्रेस पक्ष आपल्या सहकारी पक्षांचीही मदत घेताना दिसत आहे. यामुळे या यादीत इतर 3 पक्षांच्या नेत्यांचीही नावे सामील आहेत.

> काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादवही कर्नाटक निवडणुकीत प्रचार करण्यासाठी जातील. तथापि, काँग्रेसमध्ये यावर सध्या विचार सुरू आहे. परंतु या लिस्टमध्ये ज्याप्रकारे ही 3 नावे देण्यात आली आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते की, तेजस्वी यादव, अखिलेश आणि शरद पवारही काँग्रेसच्या विजयासाठी कर्नाटकात करिष्मा दाखवतील.

> कर्नाटकात 12 मे रोजी निवडणुका होतील आणि 15 मे रोजी त्याचा निकाल येईल. काँग्रेसकडून मुख्यमंत्री सिद्धारमैया मैदानात आहे, तेथेच भाजपने येदियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवले आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, काँग्रेसने जारी केलेली स्टार प्रचारकांची यादी... 

बातम्या आणखी आहेत...