आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोज यांनी मुशर्रफ यांचे केले समर्थन; भाजपचा हल्लाबोल- काँग्रेसच्या तोंडी दहशतवाद्यांची भाषा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोज यांच्या अप्रकाशित पुस्तकात मुशर्रफ यांचा उल्लेख आहे. - Divya Marathi
सोज यांच्या अप्रकाशित पुस्तकात मुशर्रफ यांचा उल्लेख आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या दोन नेत्यांच्या वक्तव्याने काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सैफुद्दीन सोज म्हणाले, 'मुशर्रफ म्हणाले होते, की काश्मीरी जनतेची पहिली पसंती स्वातंत्र्य आहे. मुशर्रफ यांचे वक्तव्य तेव्हाही योग्य होते आणि आजही तेवढेच खरे आहे.' सोज यांच्या वक्तव्यावर भाजपने जोरदार टीका केली आहे. तर, दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी म्हटले होते, '4 दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत सैन्याकडून 20 सामान्य नागरिक मारले जातात.'

 

गुलाम नबींच्या वक्तव्याचे दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाने समर्थन केले आहे. त्याचेवळी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे, की काँग्रेस नेते सैन्याचे मनोबल खच्चीकरण करत आहे. जर काँग्रेसला 44 वरुन 14 जागांवर येण्याची इच्छा असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या तारीक हमीद कारा यांची भाषा तर पाकिस्तानी दहशतवाद्यांचीच राहिली आहे. 

 

सोज यांच्या पुस्तकात मुशर्रफ यांचा उल्लेख 
- सैफुद्दीन सोज यांच्या ‘कश्मीर : ग्लिम्प्सेस ऑफ हिस्ट्री अँड द स्टोरी ऑफ स्ट्रगल’ या पुस्तकात परवेझ मुशर्रफ यांचा उल्लेख आहे. याच महिन्यात या पुस्तकाचे लोकार्पण होणार आहे. 
- सोज शुक्रवारी म्हणाले, 'मुशर्रफ म्हणत होते की काश्मीरी जनतेला पाकिस्तानमध्ये येण्याची इच्छा नाही. तुम्ही जर काश्मीरींना त्यांचा मार्ग निवडण्याची संधी दिली तर ते 'आझादी'चा मार्ग निवडतील. मुशर्रफ यांनी हे त्यांच्या देशातील उच्च पदस्थांनाही सांगितले होते. माझे देखील तेच मत आहे. मात्र मला माहित आहे की असे होणे शक्य नाही.' 

 

गुलाम नबींनी केला नरसंहाराच्या षडयंत्राचा आरोप 
- गुलाम नबी आझाद शुक्रवारी एका चॅनलसोबतच्या बातचीतमध्ये म्हणाले, की 'सरकार चार दहशतवाद्यांना मारते, त्यासोबत 20 सामान्य नागरिकांनाही मारते. सरकारची कारवाई दहशतवाद्यांविरोधात कमी आणि सामान्य नागरिकांविरोधात जास्त असते. पुलवामा येथे फक्त एका दहशतवाद्याला मारले, त्याचवेळी या कारवाई दरम्यान 13 सामान्यांचा जीव घेतला गेला. आझाद यांनी ऑपरेशन ऑलआऊटवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की या ऑपरेशनचा उद्देशच सामान्य काश्मीरींचा नरसंहाराचे षडयंत्र रचणे आहे.' 

 

काँग्रेसला पाकिस्तानातून समर्थन मिळाल्याने भाजपची टीका 
- रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांना पाकिस्तानकडून समर्थन मिळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पत्रकार परिषदेत प्रसाद म्हणाले, 'काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांना आजकाल पाकिस्तानातून तत्काळ समर्थन कसे मिळत आहे? लष्कर-ए-तोएबाकडून त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करण्यात आले आहे. गुलाम नबी आझाद यांनी शहीद औरंगजेबच्या घरी लष्कर प्रमुख आणि संरक्षण मंत्री यांचे जाणे हे नाटक असल्याचे म्हणत आहेत. काँग्रेसचे अशा प्रकारचे वक्तव्य हे भारतीय सैन्याच्या मनोधैर्याचे खच्चीकरण आहे. आमच्याकडे एक जुना व्हिडिओ आहे, ज्यामध्ये हाफिज सईद हा काँग्रेस नेत्यांचे कौतूक करत आहे.'

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, सैफुद्दीन सोज जेव्हा केंद्रात मंत्री होते, तेव्हा त्यांनी सरकारच्या मदतीने आपल्या मुलीची जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या तावडीतून सुटका केली होती. तेव्हा त्यांची मदत या लोकांनी (फुटीरतावाद्यांनी) केली नव्हती. ज्यांना भारतात राहाण्याची इच्छा आहे त्यांनी येथे राहावे. जर सोज यांना मुशर्रफ आवडत असतील तर आम्ही त्यांना पाकिस्तानचे एकतर्फी तिकीट काढून देऊ शकतो. 

बातम्या आणखी आहेत...