आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक निवडणुकीत लिंगायत समाजानंतर काँग्रेसची नजर दलित मतांवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधींनी ट्विट करुन मोदी सरकार दलित - आदिवासी विरोधी असल्याचा आरोप केला. (फाइल) - Divya Marathi
राहुल गांधींनी ट्विट करुन मोदी सरकार दलित - आदिवासी विरोधी असल्याचा आरोप केला. (फाइल)

नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. राज्य सरकारने लिंगायत समजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देऊन एका प्रमुख समाजावर आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसने आता राज्यातील दलित मतांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. सोशल इंजिनिअरंगिसाठी अनुसुचित जाती-अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात करण्यात आलेल्या बदलावर आक्रमक होताना काँग्रेस दिसत आहे. मंगळवारी सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काळ अटक केली जाणार नाही असा निर्णय दिला होता. यावर काँग्रेसने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. 

 

पक्ष नेत्यांना दिले आदेश 
- राहुल गांधी सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. मंगळवारी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर बुधवारी सकाळीच काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि संघाची ही मानसिकता आहे. ते दलित विरोधी आहेत, असा आरोप करत या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा किंवा संसदेने त्यात संशोधन करावे असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले. 
- यावरुनच कर्नाटक निवडणुकीत हा मुद्दा काँग्रेससाठी किती महत्त्वाचा आहे याचा अंदाज येतो. राहुल गांधी यांनी कर्नाटकातूनच पक्ष नेत्यांना आदेश दिले आणि दलितांशी संबंधीत निर्णयावरुन सरकराला घेरण्यास सांगितले. 
- राहुल गांधींच्या आदेशानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा, कुमारी शैलजा, ज्योतिरादित्य सिंधीया, रणदीप सिंह सुरजेवाला, अहमद पटेल यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. 
- सुरजेवालांनी सरकारवर आरोप केला की ते दलितांच्या संरक्षणाचा कायदा संपवायला निघाले आहेत. भाजप आणि संघाचा दलित विरोधी चेहरा यातून समोर आला आहे. 

 

ट्विटने झाली सुरुवात 
- दिल्लीतील पत्रकार परिषदेआधी राहुल गांधी यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'दलित आणि आदिवासींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्याच्या बचावात सुप्रीम कोर्टात मोदी सरकारने काहीही केले नाही. ते कुचकामी ठरले. यातून पंतप्रधानांनी दलित विरोधी मानसिकता आणि भाजप व संघाने आपल्याला दिलेले कर्तव्यापासून आपण दूर जात नाही हे दाखवून दिले आहे.'

 

कर्नाटकातील मतांचे गणित 
- कर्नाटकात 4 कोटींपेक्षा जास्त मतदार आहेत. ते विविध जाती, धर्मात विभागलेले आहेत. यातील 9 टक्के लिंगायत, 8 टक्के वोक्कालिगा आणि 24 टक्के दलित आहेत. मुस्लिम मतदारांची संख्या 12.5 टक्के आहे. 

 

अशी असेल रणनीती 
- राहुल गांधी हे सध्या मंदिर, मशिद आणि चर्चला भेटी देत आहेत. दुसरीकडे त्यांचा पक्ष दलित अत्याचारावरुन सरकारवर टीका करत आहे. 
- राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांच्या पंतप्रधान काळात 1989 साली अॅट्रॉसिटी कायदा तयार झाला होता. या दौऱ्यात राहुल सांगू शकतात की आमच्या सरकारने दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कायदा केला. आता मात्र नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील  सरकार  आरएसएसच्या इशाऱ्यावर दलितांना मिळालेले कायद्याचे संरक्षण काढून घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...