आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिमांत प्रचलित बहुविवाह अाणि हलाला निकाहवर तत्काळ सुनावणीस कोर्टाचा नकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मुस्लिमांत प्रचलित बहुविवाह व निकाह हलाला पद्धतीविरुद्ध तत्काळ सुनावणीस सर्वाेच्च न्यायालयाने नकार दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा म्हणाले, केंद्राचे उत्तर मिळाल्यानंतरच निर्धारित प्रक्रियेअंतर्गत सुनावणी केली जाईल. तथापि, ते म्हणाले, या प्रथांची घटनात्मक वैधता पडताळण्यासाठी पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापण्याबाबत विचार केला जाईल. 


सुप्रीम कोर्टाने २६ मार्चला या प्रथांविरुद्ध दाखल याचिका मोठ्या न्यायपीठाकडे वर्ग केल्या होत्या. याचिकाकर्त्या समीना बेगम यांच्याकडून सोमवारी अॅडव्होकेट अर्चना पाठक व अश्विनी उपाध्याय यांनी सरन्यायाधीशांकडे मंगळवारीच सुनावणीची मागणी केली होती. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले, सुनावणीची इतकी घाई होती तर उन्हाळी सुटीदरम्यान सुटीकालीन पीठासमोर खटल्याचा का उल्लेख केला नाही? त्यावर वरिष्ठ वकील व्ही. शेखर म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या प्रकरणांच्या अॅडव्हान्स लिस्टमध्ये सुनावणीसाठी हे प्रकरण दिसत होते. मात्र आता ते हटवण्यात आले. दुसरीकडे, वकील ऐश्वर्या भाटी म्हणाल्या, दबावामुळे आमच्या अशीलाने याचिका मागे घेतली आहे. दरम्यान, केंद्राकडून अति. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, याचिकांवर केंद्र सरकार आपले उत्तर सादर केले.

 

बातम्या आणखी आहेत...