आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएनएक्स मीडिया प्रकरणी कार्ती चिदंबरम यांच्या कोठडीत आणखी ९ दिवसांची वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणात कार्ती चिदंबरम यांच्या अडचणी सध्या कमी होण्याची शक्यता नसल्याचे दिसत आहे. माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती यांना आज दिल्ली न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी सुनावणीत न्यायालयाने सीबीआयची मागणी मान्य करत कार्ती यांच्या कोठडीमध्ये 9 दिवसांची वाढ केली आहे. 

सीबीआयने कोर्टासमोर आज आतापर्यंत केलेल्या चौकशीची काही कागदपत्रे सादर केली. त्याच्या आधारे आणखी चौकशीसाठी कोठडीची मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली. 


आई वडिलांना भेटण्यास परवानगी 
सुनावणीच्या वेळी कार्ती यांचे वडिल आणि माजी मंत्री पी चिदंबर आणि आई नलिनी यांचीही कोर्टात उपस्थिती होती. त्यांच्याशी भेट होण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. त्यावर कोर्टाने त्यांना भेटण्याची परवानगी देत 10 मिनिटांचा वेळ भेटण्यासाठी दिला. 


इंद्राणी मुखर्जीसमोर झाली चौकशी
याआधी झालेल्या चौकशीमध्ये सीबीआयने कार्ती चिदंबरम यांना मुंबईला नेऊन त्यांची चौकशी केली. मुंबईत भायखळा तुरुंगात इंद्राणी मुखर्जी समोर या प्रकरणी त्यांची चौकशी झाली. 

 

 

बातम्या आणखी आहेत...