आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Court Orders Fir Against Mithun Chakrabortys Son Mahakshay And Wife Yogeeta Bali

Mithun chakraborty\'s son: लग्नाच्या ५ दिवसांआधी मिथुन चक्रवर्तीचा पुत्र बलात्काराच्या गुन्ह्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती लग्नाच्या ५ दिवसांआधीच बलात्काराच्या प्रकरणात अडकला आहे. दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने महाक्षय चक्रवर्तीविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा गुुन्हा दाखल करण्याचे अादेश दिले आहेत. मिथुन यांच्या पत्नी योगिता बाली यांनाही मुलाच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्याचे आदेश कोर्टाने दिले. रात्री उशिरापर्यंत या सर्वांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 


अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट एकता गाबा यांच्या कोर्टात तक्रार करणाऱ्या तरुणीने आपण बॉलीवूड व भोजपुरी चित्रपटांतील अभिनेत्री असल्याचे सांगितले आहे. ती एप्रिल २०१५ मध्ये महाक्षयच्या संपर्कात आली. आरोपानुसार, मे २०१५ मध्ये महाक्षयने तिला एका फ्लॅटमध्ये नेऊन शारीरिक संबंध ठेवले. लग्नाच्या आमिषाने त्याने अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गरोदर झाल्यानंतर तिचा गर्भपातही केला. 


तरुणीचा दावा आहे की, महाक्षय चक्रवर्ती हा लग्नास आता नकार देत आहे. ७ जुलैला त्याचा एका दुसऱ्या तरुणीशी विवाह होत आहे. विशेष म्हणजे, येत्या ७ जुलैला महाक्षय याचा विवाह दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची कन्या मदालसा हिच्यासोबत होत आहे. 

 

7 जुलैला महाक्षयचा विवाह 
येत्‍या 7 जुलैला महाक्षय आणि प्रसिद्ध दिग्‍दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी मदालसा शर्मा यांचा विवाह समांरभ आहे. मदालसाने तामिळ आणि तेलगू सिनेमांतही काम केले आहे. मात्र या आरोपांमुळे या विवाहाचे भवितव्‍य आता अंधारात असल्‍याचे म्‍हटले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...