आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • बलात्कार पीडिता म्हणाली सेवेच्या नावावर मूत्र पिण्यासाठी दबाव टाकायचा दाती महाराज Daati Maharaj Case Victim Allegations Pressurised To Drink Urine

बलात्कार पीडिता म्हणाली- सेवेच्या नावावर मूत्र पिण्यासाठी दबाव टाकायचा दाती महाराज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाती महाराजाच्या आश्रमाचे फुटेज तपासून अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले.

तपास अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून केस मुख्य मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात ट्रान्सफर.

 

नवी दिल्ली - दाती महाराज बलात्कार प्रकरणात क्राइम ब्रांचने सोमवारी साकेत कोर्टात 3 पानांची स्टेटस रिपोर्ट दाखल केली. क्राइम ब्रांचने स्टेटस रिपोर्टमध्ये म्हटले की, पीडित शिष्येचे आरोप 2 वर्षे जुने आहेत. त्यांची सत्यता तपासली जात आहे. पोलिसांच्या मते, शिष्येचा आरोप आहे की, दाती महाराज राजस्थानच्या आश्रमात चरणसेवेच्या नावावर मूत्र प्राशन करण्याचा दबाव टाकायचा. दुसरीकडे, मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट अनुराग दास यांनी केसचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विनंतीवरून हा खटला मुख्य मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात ट्रा्न्सफर केला. सुनावणी 26 जून रोजी होईल.

 

दाती महाराजाच्या आश्रमातील फुटेज तपासत आहेत पोलिस
स्टेटस रिपोर्टनुसार, शिष्येचे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोपांमागील तथ्य आणि आरोपींकडून निर्दोषत्वाचे दावे या सर्वांचा सखोल तपास केला जात आहे. दाती महाराजाच्या आश्रमातील फुटेज शोधून अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

 

3 जणांचे जबाब नोंदवले, पुरावे गोळा करण्यास पोलिसांची प्राथमिकता
पोलिसांनी सोमवारी नवीन गुप्ता, सचिन जैन आणि शक्ती अग्रवाल यांची चौकशी केली. क्राइम ब्रांच ऑफिसमध्ये या तिघांचे जबाब नोंदवण्यात आले. येथे अनेक तास थांबण्यादरम्यान या तिघांनी स्वत:च्या बाबासोबतच्या संबंधांची सविस्तर माहिती दिली. या तिघांवर बाबाने कटाचा आरोप केला आहे. दातीने आरोप केला होता की, या लोकांनी त्यांना 32 कोटी रुपयांची मागणी केली होती, ती पूर्ण न केल्याने त्यांनी कट रचून खोट्या प्रकरणात अडकवले. डीसीपी क्राइम ब्रांच राजेश देव म्हणाले की, याप्रकरणी प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून तपास केला जात आहे.

 

आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत दातीने
6 जून रोजी शिष्येने फतेहपुर बेरी पोलिसांत तक्रार दाखल करून दाती महाराज आणि त्याच्या भावांवर बलात्काराचा आरोप केला होता. 11 जून रोजी याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली होती. 12 जून रोजी केस क्राइम ब्रांचकडे ट्रान्सफर झाली होती. 14 जून रोजी दाती महाराजांच्या आश्रमाच्या तपासणीसाठी सर्च वॉरंट जारी केले होते. 19 जून रोजी आरोपींची चौकशी करण्यात आली होती, यात त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते. 22 जून रोजीही पोलिसांनी दाती महाराजाची 8 तास चौकशी केली होती.  

बातम्या आणखी आहेत...