आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • बलात्काराच्या आरोपानंतर महाराज फरार Daati Maharaj Is Absconding After Rape Charges

Daati Maharaj Case: बलात्काराच्या आरोपानंतर महाराज फरार, आश्रमात स्मशान शांतता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाती महाराजाविरोधात त्यांच्या शिष्येने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. - Divya Marathi
दाती महाराजाविरोधात त्यांच्या शिष्येने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली - बलात्काराचे आरोप आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर दाती महाराज अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. दाती महाराजाच्या विविध ठिकाणांवर पोलिसांनी छापेमारी सुरु केली आहे. त्यासोबतच महाराजांच्या संबंधीत लोकांची चौकशी करण्यात येत आहे. मात्र पोलिसांना दाती महाराजांपर्यंत पोहोचण्यात यश आलेले नाही. दाती महाराजवर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर दिल्लीतील त्यांच्या आश्रमात सन्नाटा पसरला असून महाराज फरार आहे. 

 

कोण आहे दाती महाराज
- दाती महाराज हे शनिधामचे संस्थापक असून विविध टीव्ही चॅनल्सवर राशिफल सांगत असतात.
- दक्षिण दिल्लीतील फार्म हाऊसमध्ये त्यांचे कार्यालय आहे.

 

काय आहे प्रकरण 
- दाती महाराजवर त्याच्याच शिष्येने बलात्काराचा आरोप केला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीत मह्टले आहे की दाती महाराज यांच्या दिल्लीतील शनिधाम येथे दोन वर्षांपूर्वी (2016) महिलेचे लैंगिक शोषण झाले होते. 
- समाजभय आणि बदनामीच्या भीतीने दोन वर्षे तक्रार केली नसल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. 
- दाती महाराजकडून अत्याचारानंतर पीडिता आश्रमातून पळून गेली होती. त्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली. आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महिलेने दोन आठवड्यांपूर्वी फतेहपुरबेरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 
- अशीही माहिती आहे, महिलेच्या तक्रारीनंतर पोलिस अधिकाऱ्याने दाती महाराजकडे चौकशीही केली, मात्र त्यांनी चौकशीला योग्य प्रतिसाद दिला नाही. आता बाबा फरार झाले आहेत. 

 

दाती महाराजवर या कलमा खाली गुन्हा 
- पोलिसांनी दाती महाराजवर कलम 376 (बलात्कार), 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि 354 (छेडछाड) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...