आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • बलात्काराचा आरोपी दाती महाराजाची आज क्राइम ब्रँचकडून चौकशी, अटकेचीही शक्यता Dati Maharaj To Be Present In Front Of Crime Branch

बलात्काराचा आरोपी दाती महाराजाची आज क्राइम ब्रँचकडून चौकशी, अटकेचीही शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दातीवर दिल्लीच्या फतेहपूर बेरी पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.
तरुणीचा आरोप आहे की, दातींनी दिल्ली आणि पाली येथील आश्रमात तिच्यावर बलात्कार केला होता.
 
नवी दिल्ली - आपल्या शिष्येवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या दाती महाराजांची सोमवारी चाणक्यपुरी येथील क्राइम ब्रँच ऑफिसमध्ये चौकशी व्हायची आहे. यावेळी महाराजाला अटकही होऊ शकते. तथापि, तपासात तो सहभागी असेल वा नाही यावर सस्पेन्स बनलेला आहे. क्राइम ब्रँचच्या एका अधिकाऱ्याच्या मते, जर त्याने तपासात सहकार्य केले नाही, तर त्याच्या अडचणी वाढू शकतात. तथापि, या केसशी संबंधित पुरेसे पुरावे हाती लागल्यावरच पुढील कारवाई होईल. क्राइम ब्रँचच्या एक टीमने काही दिवसांपूर्वीच दातीच्या दिल्ली आणि राजस्थानच्या पाली स्थित आश्रमांत तपास केला आहे. दाती अजून फरार आहे. त्याने चौकशीसाठी सोमवारपर्यंत वेळ मागितला होता.
 
दिल्ली क्राइम ब्रँचची एक टीम शनिवारी पीडितेसोबत राजस्थानच्या पाली स्थित दाती महाराजांच्या आलावास आश्रमात पोहोचले होते. दिवसभर शोध घेण्यात आला. महाराज येथून दोन दिवसांपूर्वीच फरार झाला होता. पीडितेने पोलिसांना आश्रमातील त्या खोल्या दाखवल्या जेथे तिच्यावर बलात्कार झाला होता. पीडितेने दातीशिवाय तिची आई श्रद्धा, अनिल कुमार, अर्जुन, अशोक आणि निमाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
 
अशी आहे दातीची हिस्ट्री...
दातीचा जन्म 10 जुलै 1950 रोजी पालीच्या आलावास गावात झाला होता. नाव होते महाराज. वडील देवाराम मेघवाल ढोल वाजवून चरितार्थ चालवायचे. महाराजाच्या जन्माच्या 4 महिन्यांनीच त्याच्या आईचे निधन झाले. काही वर्षांनीच वडीलही वारले. महाराज गावातील एका व्यक्तीसोबत दिल्लीला आणि चहाच्या टपरीवर काम करू लागला. दरम्यान, महाराजाने केटरिंगही सुरू केली. हा व्यवसाय चांगला चालला. महाराजाने 1996 पर्यंत दिल्लीमध्येच काम केले. केटरिंगच्या धंद्यादरम्यान महाराजाचा संपर्क भविष्यफळ पाहणाऱ्या राजस्थानी व्यक्तीशी झाला. महाराजाने त्याला गुरू बनवले आणि ज्योतिष शिकू लागला. दिल्लीच्या कैलाश कॉलोनीत पहिले ज्योतिष सेंटर उघडले. नाव बदलून दाती महाराज ठेवले. दातीने एक प्रसिद्ध व्यक्तीची भविष्यवाणी केली, जी खरी ठरली. यामुळे खुश होऊन त्या व्यक्तीने दातीला दिल्लीतील फतेहपुर बेरीमध्ये आपले वडिलोपार्जित मंदिर दान केले. येथे महाराजाने शनिधाम मंदिराची स्थापना केली. यानंतर दातीचे नशीब फळफळले. अनेक टीव्ही चॅनेल्सवर दातीचा ज्योतिष प्रोग्राम येऊ लागला, यानंतर त्याची ओळख मोठमोठ्या नेत्यांशी आणि उद्योगपतींशी झाली. 

 

7 एकरावर आहे शनिधाम मंदिर अन् आश्रम
दातीने ज्या शनिधाम मंदिराची स्थापना केली, ते आज साऊथ दिल्लीच्या पॉश परिसर छतरपुरमध्ये येते. शनिधाम मंदिराला लागूनच दाती महाराजाचा एक फार्म हाऊसही आहे. फतेहपुर बेरीमधील दाती महाराजाचे हे आश्रम 7 एकर जमिनीवर विस्तारलेले आहे. यानंतर दातीने पालीमध्ये बेवारस मुलांचा एक आश्रम, शाळा आणि मोठी गोशाळाही काढली. दातीने आश्रम चालवण्यासाठी एक कमिटी बनवली, ज्याचे कोट्यवधींचे बजेट आहे. ही कमिटी दरवर्षी शनि अमावास्येला कार्यक्रमाचे आयोजन करते, ज्यात कोट्यवधींची देणगी येते. बाबाच्या गैरहजेरीत बाबाचे काम त्याचा भाऊ अर्जुन पाहतो. बाबाला 2010 मध्ये हरिद्वारमध्ये झालेल्या कुंभ मेळ्यात महामंडलेश्वर उपाधि मिळाली होती. 

बातम्या आणखी आहेत...