आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना होणार फाशी, मंत्रालयाचा कायद्यात संशोधनाचा प्रस्ताव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांवर लैंगिक अत्याचाराचा मुद्दाही गंभीर होत चालला आहे. - Divya Marathi
मुलांवर लैंगिक अत्याचाराचा मुद्दाही गंभीर होत चालला आहे.

नवी दिल्ली - महिला आणि बालविकास मंत्रालयाने मुलांसोबत होणाऱ्या लैंगिक अत्याचारावरही कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कायद्यात संशोधनाची तयारीही मंत्रालयाने व्यक्त केली आहे. नुकतेच केंद्र सरकारने 12  वर्षांपर्यंतच्या मुलीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीच्या शिक्षेचा अध्यादेश काढला आणि त्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंदूरी दिली आहे. त्यानंतर मंत्रालय मुलांबाबतच्या लैंगिक शोषणाची गंभीर दखल घेऊन कायद्यात बदलाचा विचार करत आहे. 


- मंत्रालयाने गुरुवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे, की सरकारने आता लैंगिक शोषणाचे शिकार ठरलेल्या मुलांना न्याय देण्याच्या दृष्टीने पॉक्सो अॅक्टमध्ये संशोधनाचा प्रस्ताव तयार केला आहे. 
- महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी म्हटले आहे की लैंगिक शोषण ही गंभीर समस्या आहे. त्या म्हणाल्या, 'बाल लैंगिक शोषण हा सर्वाधिक दुर्लक्षिला जाणारा वर्ग आहे. मात्र तो सर्वाधिक पीडित आहे. यात मुलांचीही संख्या गंभीर आहे. बाल लैंगिक शोषणात लिंगाच्या आधारावर कोणताच भेदभाव नाही.'

बातम्या आणखी आहेत...