आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कराला 400 ड्रोन, अत्याधुनिक शस्त्रांची गरज, संरक्षण मंत्रालयाने बनवला रोडमॅप-2018

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पुढच्या 10 वर्षांत भारतीय लष्कराला 400 अत्याधुनिक ड्रोन विमानांची गरज आहे. यात कॉम्बॅट आणि पानबुडीतून लाँच होणाऱ्या रिमोट संचलित एअरक्राफ्टचा समावेश आहे. सोबतच शत्रूंच्या ठिकाणांना लक्ष्य करणारे हायपॉवर लेझर आणि माइक्रोवेव्ह वेपन्स सुद्धा आवश्यक आहे. सद्यस्थितीला भारतीय लष्कराकडे 200 ड्रोन आहेत. यात लांब टप्पा आणि कमी टप्प्यात लक्ष्य करता येणाऱ्या ड्रोनची खरेदी इस्रायलकडून करण्यात आली आहे. लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी संरक्षण मंत्रालयाने रोडमॅप-2018 तयार केला आहे.

 

- "रोडमॅप-2018' च्या कागदपत्रात 2020 च्या दशकात लष्कराला लागणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा उल्लेख करण्यात आला आहे. 
- 82 पानांच्या या अहवालाचा मुख्य हेतू संरक्षण क्षेत्राला भारतीय लष्कराच्या गरजांची जाणीव करून देणे आणि लष्कराला ते पुरवठा करण्यासाठी मदत करणे असा आहे. या उपकरणांची निर्मिती मेक इन इंडिया अंतर्गत केली जाणार आहे.
- डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अहवालानुसार, लष्कराला नेक्स्ट जनरेशन पानबुडी, डिस्ट्रॉयर आणि फ्रिगेट्स, मिसाइल, इन्फँट्री वेपन्स, विशेष अॅम्युनिशन आणि सीबीआरएन (केमिकल, बॉयोलॉजिकल, रेडियोलॉजिकल, न्युक्लिअर) डिफेन्स सिस्टिम सोबतच 400 ड्रोन विमानांची गरज आहे. 

 

डीआरडीओ बनवतेय कॉम्बॅट ड्रोन
डिफेंस रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनाइझेशन (डीआरडीओ) 2650 कोटी रुपयांच्या प्रकल्पांतर्गत घातक स्टील्थ यूसीएव्ही (कॉम्बॅट ड्रोन) तयार करत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या रोडमॅपमध्ये लष्कर आणि नौदलासाठी 30 रिमोट संचलित ड्रोनची गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्यातही हे ड्रोन 30 हजार फुट उंचीवर सलग 24 तास उडण्यासाठी सक्षम असणे आवश्यक आहे. 

बातम्या आणखी आहेत...