आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनिमूनच्या तिसऱ्याच दिवशी पतीला सोडून गेली होती एअर होस्टेस, यामुळे भ्यायली होती अनीशिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - दिल्लीमध्ये एअर होस्टेस अनीशियाच्या मृत्यूवर तिच्या आईनेच नवा खुलासा केला आहे. पोलिस म्हणतात, एअर होस्टेसच्या आईने सांगितले की, हनिमूनवर पती मयंकने अनीशियाला मारहाण केली होती, यानंतर अनीशिया खूप भ्यायली होती, यामुळे तिची काउंसलिंग करावी लागली होती. अनीशियाच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी आरोप केला आहे की, तिच्यासोबत कौटुंबिक हिंसा झाली होती. तिला हुंड्यासाठी त्रास देण्यात येत होता. यामुळेच तिची हत्या करण्यात आली. आता पोलिस या डेथ मिस्ट्रीला सॉल्व्ह करण्यासाठी क्राइम सीन रिक्रिएट करणार आहेत. 

 

असे आहे प्रकरण...

14 जुलैच्या संध्याकाळी दिल्लीच्या पंचशील पार्क परिसरात राहणाऱ्या अनीशियाची डेडबॉडी तिच्या घराच्या छताखाली आढळली होती. पतीचे म्हणणे आहे की, तिने छतावरून उडी मारून आत्महत्या केली. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

लग्नानंतर करू लागला होता मारहाण
आईने पोलिसांना सांगितले की, लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी मुलीने तक्रार केली होती की, मयंकने तिला बेदम मारहाण केली. यानंतर मुलीची काउंसलिंग करण्यात आली. मग काही दिवस सगळे ठीक होते, परंतु नंतर दर आठवड्याला अनीशियाला तिचा पती मारू लागला होता.


'हाच माणूस आहे माझ्या मृत्यूला जबाबदार'
अनीशियाचा भाऊ करण बत्रा म्हणाला, घटनेच्या दिवशी बहिणीने 2 वाजता मेसेज केला होता. यात लिहिले होते की, माझी मदत कर. मयंकने मला रूममध्ये बंद केले आहे. याला (मयंक) सोडू नकोस, हाच माणूस माझ्या मृत्यूला जबाबदार असेन. यानंतर 4 वाजता फोन आला की, बहिणीचा मृत्यू झाला आहे.
- अनीशियाचा भाई करणने मयंकवर आरोप ठेवला आहे की, तो त्याच्या बहिणीला मारहाण करायचा, आणि तिला रूममध्ये बंद करून ठेवायचा.
  
मृत्यूआधी पतीलाही केला मेसेज
पोलिस सांगतात, जेव्हा अनीशियाचा मृत्यू झाला त्याच्या काही वेळापूर्वीच तिने पती मयंकलाही मेसेज केला होता. त्या वेळी मयंक घरातच होता. अनीशियाने मेसेज केला की 'ती एक मोठे पाऊल उचलणार आहे.' यानंतर मयंकने अनीशियाला शोधले. जेव्हा ती आढळली नाही, तेव्हा तो छतावर गेला. तेथेही अनीशिया आढळली नाही. मग खाली पाहिल्यावर ती जखमी अवस्थेत पडलेली दिसली. तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

- एअर होस्टेसच्या कुटुंबीयांनी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या मते, चंडीगढ़मध्ये जन्मलेली अनीशिया बत्रा (39) लुफ्थांसा एयरलाइन्समध्ये एयर होस्टेस होती. फेब्रुवारी 2016 मध्ये मयंक सिंघवीशी तिचे लग्न झाले होते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...

 

बातम्या आणखी आहेत...