आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chandrababu Naidu Claims I Have Been To Delhi For 29 Times But No Benefit Was Given

केंद्रामध्ये टीडीपीच्या,अांध्रात दाेन भाजप मंत्र्यांचा राजीनामा;टीडीपी फक्त केंद्रातून बाहेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/हैदराबाद- आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून तेलगू देसम पार्टीचे दोन केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू आणि वायएस चौधरी यांनी गुरुवारी एनडीए सरकारमधून राजीनामा दिला. तत्पूर्वी विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री चौधरी म्हणाले की, लग्न झाल्यानंतर सर्वच आनंदी असतात, पण घटस्फोटाच्या वेळी तसे नसते. हे चांगले पाऊल नसले तरी परिस्थितीच अशी निर्माण झाली की मी व माझे सहकारी नागरी विमान मंत्री राजू हेही राजीनामा देत आहेत. यासाठी भाजपलाच जबाबदार ठरवत चौधरी म्हणाले, आपल्या पक्षाध्यक्षांनी सांगितले आहे की आम्ही एनडीएमध्ये कायम राहू. लोकसभेत या दोन्ही मंत्र्यांसह तेदेपाचे १६ खासदार आहेत. दरम्यान, या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी तेदेपाचे प्रमुख आणि आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी फोनवरून चर्चा केली. 

 

टीडीपीच्या आधी भाजप मंत्र्यांनी साेडली पदे
आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू सरकारमधील भाजपच्या कोट्यातील दोन मंत्री आरोग्यमंत्री के. श्रीनिवास व देणगीमंत्री पी. मणिक्याला यांनी गुरुवारी दुपारीच मुख्यमंत्र्यांना भेटून राजीनामा दिला. श्रीनिवास म्हणाले, राज्यातील सध्याची परिस्थिती दुर्दैवी आहे. दरम्यान, आंध्र आणि तेलंगणच्या भाजप नेत्यांनी चंद्राबाबूंना संधिसाधू म्हटले आहे. 

 

चंद्राबाबूंना प्रेरणा शिवसेनेची : राऊत
‘चंद्राबाबू महिनाभरापासून या निर्णयाच्या विचारात हाेते. जी गोष्ट पटत नाही, त्याविरोधात आवाज उठवायचा, हा धडा शिवसेनेने घालून दिला आहे. अामच्याकडून प्रेरणा घेऊनच त्यांनी सरकारविरुद्ध आवाज उठवला,’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...