आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाती मदनच्या शोधात दिल्ली पोलिसांची क्राइम ब्रँच पाली आश्रमात, पीडितेने दाखवली दुष्कर्म झालेली जागा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाली - शिष्येवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला दाती मदन उर्फ दाती महाराज याच्या पाली येथील आलावास आश्रमावर शनिवारी दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने छापा टाकला आहे. मात्र पोलिसांना येथेही दाती सापडला नाही. यावेळी पीडिताही पोलिसांसोबत होती. पीडितेचा आरोप आहे, की दिल्लीच्या आश्रमासह येथील आश्रमातही तिच्यासोबत दातीने दुष्कर्म केले. पीडितेने पाली आश्रमातील त्या दोन रुमही दाखवल्या जिथे दातीने तिच्यासोबत दुष्कर्म केले होते. 

 

दाती करणार आत्मसमर्पण

दाती स्वतः पोलिसांना शरण येणार आहे. त्यासाठी त्याने सोमवारपर्यंतचा वेळ मागितला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. दातीने शुक्रवारी म्हटले होते, की मी कुठेही पळून जाणार नाही. चौकशीसाठी मला जेव्हा बोलवले जाईल तेव्हा मी हजर होऊ शकतो. 

दातीविरोधात पीडितेने दिल्लीतील फतेहपूर बेरी पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यावरुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...