आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi HC Called PNB Fraud Case Sketchy Seeks ED Response On Nirav Modis Firm Plea

PNB फ्रॉड : नेमका किती घोटाळा झाला हे स्पष्ट नाही, ईडीने सर्व कागदपत्र सादर करावे - हायकोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीएनबीच्या मते आता घोटाळ्याची रक्कम वाढून 12,672 कोटींवर गेली आहे. - Divya Marathi
पीएनबीच्या मते आता घोटाळ्याची रक्कम वाढून 12,672 कोटींवर गेली आहे.

नवी दिल्ली - दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे की, पीएनबी घोटाळा नेमका किती कोटींचा आहे आणि ईडी या प्रकरणी कशाच्या आधारे कारवाई करत आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नीरव मोदींची फर्म फायरस्टार डायमंडकडून या कारवाईच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी कोर्टाने हे वक्तव्य केले आहे. कोर्टाने या प्रकरणात ईडीला नोटीस पाठवत पुढील सुनावणीला म्हणजे 19 मार्च रोजी खटल्याशी संबंधित दस्तऐवज दाखल करावे असे म्हटले आहे. 


हायकोर्टाने आणखी काय म्हटले?
- याचिकेसंबंध बोलताना जस्टिस एस मुरलीधर आणि आयएस मेहता यांच्या पीठाने सुनावणी केली. पीठाने म्हटले की, ईडी यावर काय म्हणते हे पाहावे लागेल, कारण विजय अग्रवाल (नीरव यांचे वकील) स्वतःचा खटल्याच्या तथ्यांबाबत समाधानी नाहीत. 
- न्यायालयाच्या पीठाने ईडीला फायरस्टार डायमंड इंटरनेशनच्या सर्च वारंटच्या कॉपीसह खटल्याशी संबंधित इतर पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. पीठाने कारवाईवर स्थगिती लावण्यास नकार दिला आहे. ईडीचे उत्तर आल्यानंतरच स्टेबाबत विचार केला जाईल असे कोर्टाने म्हटले आहे. 
- कोर्टाने ईडीला पीएनबी फ्रॉडशी संबंधित आतापर्यंतच्या कारवाईचा क्रमवारीनुसार अहवाल पुढील सुनावणीत सादर करण्यास सांगितले आहे. 


याचिकेतील मागणी?
- फायरस्टार डायमंडचे वकील विजय अग्रवाल यांनी याचिकेत फर्मच्या विरोधात पीएनबी प्रकरणी ईडीकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर स्थगिती आणण्याची मागणी केली होती. 
- त्याशिवाय कोर्टामध्ये अशी माघणी करण्यात आली होती की, ईडी फर्मने ज्या एन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट (ईसीआयआर) च्या आधारे एजन्सीने फर्मच्या विविध ठिकाण्यांवर छापे मारले त्याची कॉपी देण्याची मागणीही करण्यात आली. 
- तर अॅडिशनल सॉलिसिटर जनरल संदीप सेठी आणि वकील अमित महाजन यांनी फर्मची याचिका तथ्यहीन असल्याचे म्हटले. 


अशी झाली कारवाई?
- पीएनबी घोटाळ्यामध्ये आतापर्यंत ईडीने देशभरात नीरव मोदींशी संबंधित 6,393 कोटींपेश्रा अधिकची मालमत्ता जप्त केली आहे. सध्या नीरवमोदींच्या ठिकाणांहून जप्त केलेले दागिने आणि मालमत्तेचे व्हॅल्यूएशन केले जात आहे. 
- दुसरीकडे गीतांजली जेम्सच्या शोरूमवरही छापे मारण्यात आले, त्यात 22 कोटींचे दागिने जप्त करण्यात आले आणि काही हजार कोटींची मालमत्ता अटॅच करण्यात आली आहे. 
- त्याशिवाय मुंबईच्या स्पेशल कोर्टाने 3 फेब्रुवारीला नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. नीरव यांच्या वकिलांनी याला हाय कोर्टात आव्हान देण्याची मागणी केली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...