आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INX मीडिया केस: कार्ती चिदंबरमला दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा, 20 मार्चपर्यंत अटकेला स्थगिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया केसमध्ये आरोपी आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याला दिल्ली हायकोर्टाने दिलासा दिला आहे. 20 मार्चपर्यंत कार्तीच्या अटकेला हायकोर्टाने बंदी घातली आहे. कार्तीने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती, की 9 मार्चला सीबीआय रिमांड संपत आहे. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्याची शक्यता आहे. यावर सुनावणी करताना हायकोर्टाने 20 तारखेपर्यंत अटकेवर अंतरिम स्थगिती दिली आहे. कार्ती चिदंबरमला 28 फेब्रुवारी रोजी सकाळी चेन्नई विमानतळावरुन अटक करण्यात आली होती. त्यानंतर ट्रायल कोर्टाने त्याला सीबीआय कस्टडी सुनावली होती. कार्तीवर आरोप आहे की त्याने आयएनएक्स मीडियाला एफआयपीबी क्लियरन्ससाठी 6.5 कोटी रुपये लाच घेतली होती. 

 

कोर्टाने कार्तीच्या याचिकेवर ईडीकडून उत्तर मागवले 
- न्यूज एजन्सीनुसार, हायकोर्टाने म्हटले आहे की सीबीआय प्रकरणात ट्रायल कोर्टाकडून कार्तीला जामीन मिळाला तर पुढील सुनावणीपर्यंत त्याला अटक करता येणार नाही. पुढील सुनावणी 20 मार्च रोजी आहे. 
- कार्तीने दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने केंद्र सरकार आणि ईडीकडून उत्तर मागवले आहे. 

ईडीचे समन्स रद्द करण्यासाठी कार्ती कोर्टात 
- कार्तीला ईडीने समन्स बजावले आहे. त्यावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. तेव्हा कोर्टाने ईडीच्या कारवाईवर स्थिगती आणण्यास नकार दिला. त्यानंतर कार्तीने दिल्ली हायकोर्टासमोर समन्स रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. 
- अॅडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात याचिकेला विरोध करताना म्हटले होते की कोर्टासमोर अशा 50 याचिका पेंडिंग आहेत. त्यानंतर कार्तीचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी याचिका मागे घेतली होती. 
- सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत कार्तीने म्हटले होते, की एफआयआरमध्ये ज्या प्रकरणांचा उल्लेख आहे, त्याशिवायही अनेक प्रकरणात चौकशी होत आहे. ईडीला अशा प्रकरणांच्या चौकशीचा अधिकार नाही.

 


काय आहे 'आयएनएक्स' प्रकरण?
- मनी लाँड्रिंगचे हे प्रकरण आयएनएक्स मीडियाशी संबंधीत आहे. आयएनएक्सचे डायरेक्टर पीटर आणि इंद्राणी मुखर्जी आहेत. हे दोघेही शीना बोरा हत्याकांडात आरोपी आहे.
- कार्तीवर आरोप आहे की त्याने आयएनएक्स मीडियाला फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड (एफआयपीबी) याची गैरमार्गाने परवानगी मिळवून दिली. त्यानंतर आयएनएक्सला 305 कोटी रुपये फंड मिळाला होता. त्याबदल्यात कार्तीला 10 लाख डॉलर लाच देण्यात आली होती. 
- आयएनएक्स मीडिया आणि कार्तीच्या थेट किंवा अप्रत्यक्षरित्या संबंध असलेल्या कंपन्या यांच्यात 3.5 कोटींचे व्यवहार झाले होते. 
- याशिवाय कार्तीवर आरोप आहे की त्याने इंद्राणीच्या कंपनीविरोधात टॅक्सचे एक प्रकरण त्याच्या वडिलांच्या पदाचा वापर करुन सेटल केले होते.

बातम्या आणखी आहेत...