आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Anticipatory Bail: सुनंदा मृत्यू प्रकरणात थरुर यांना अटपूर्व जामीन, परदेशवारीवर लागले निर्बंध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पतियाळा हाउस कोर्टने काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा अटकपूर्व जामीन गुरुवारी मंजूर केला आहे. पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांच्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आरोप आहेत. दिल्ली पोलिसांनी थरुर यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला होता. पण, कोर्टाने 1 लाख रुपयांच्या खासगी जातमुचलक्यावर थरुर यांना दिलासा दिला. तरीही, या दरम्यान खासदार थरुर यांना परदेशवारी करता येणार नाही. काँग्रेस नेत्याला जामीन मिळताच भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी प्रतिक्रिया जाहीर केली. जल्लोष साजरा करण्याची गरज नाही. ते काही तिहाड जेलमध्ये नाही. ते आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या रांगेत बसू शकतात. अखेर ते दोघे सुद्धा जामीनवाले ठरले आहेत. असा उपहास स्वामींनी केला. 


खासदार शशी थरुर यांना अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी समर विशाल यांच्यासमोर शनिवारी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तत्पूर्वी 5 जून रोजी पतियाळा हाउस कोर्टने म्हटले होते, की थरूर यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी मुबलक पुरावे नाहीत. कोर्टाने त्यांना 7 जुलै रोजी हजर होण्याचे आदेश दिले होते. दिल्ली पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात थरूर यांच्या विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि पत्नीसोबत क्रूरता करण्याचे आरोप लावले आहेत. पोलिसांच्या मते, थरूर यांच्या विरोधात आरोपांची चौकशी निःपक्षपणे करण्यात आली आहे. 


दिल्लीतील हॉटेलात सापडला होता मृतदेह
17 जानेवारी 2014 च्या रात्री दिल्लीतील लीला हॉटेलच्या रुम नंबर 345 मध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थित सापडला होता. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. तसेच वर्षभरात हत्येच्या अँगलने तपास करण्यास सुरुवात केली. एम्सच्या शवविच्छेदन अहवालानुसार, सुनंदा यांच्या शरीरात विष सापडलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणात थरुर यांची कसून चौकशी केली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...